नवरात्री विशेष; दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना केल्यास होईल लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 04:29 PM2020-10-16T16:29:36+5:302020-10-16T16:31:31+5:30

मोहन दाते; २५ आॅक्टोबर रोजी होणार दसरा साजरा

It is beneficial to get married at 2 in the afternoon | नवरात्री विशेष; दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना केल्यास होईल लाभ

नवरात्री विशेष; दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना केल्यास होईल लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देदुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सवनवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जातेशनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक

सोलापूर : दुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव १७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २५ आॅक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे. या वर्षी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे भागामध्ये २३ आॅक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास असून, उर्वरित महाराष्ट्रामध्ये २४ आॅक्टोबर रोजी महाअष्टमी उपवास करावा, असेही दाते यांनी सांगितले आहे.
----------
नवरात्रीच्या नवव्यादिवशी दसरा...
दरम्यान, मंगळवार २० आॅक्टोबर रोजी ललिता पंचमी, २३ आॅक्टोबरला महालक्ष्मी पूजन, २४ रोजी महाअष्टमीचा उपवास, २५ आॅक्टोबर रोजी रविवारी नवरात्र समाप्त होणार असून, याचदिवशी दसरा साजरा होणार आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एकाच दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसºयापर्यंत नऊ दिवस किंवा दहा दिवसांचे अंतर असते. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झाल्याचे दाते यांनी सांगितले़
------------
देवी उपासनेचा काळ...
हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचा एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. नवरात्र उत्सवाची सुरुवात उद्या (शनिवार) आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात. नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रं म्हटली जातात. या घटासमोर बसून उपासना करणा?्यांचे मन शांत, प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन् समाधान लाभते.

 

Web Title: It is beneficial to get married at 2 in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.