शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीवरील फोटोचा गैरवापर तर होत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 11:51 IST

सायबर गुन्हे : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटरचा वापर वाढला

सोलापूर : अलीकडे सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटरचा वापर वाढल्यामुळे या सायबर गुन्हेगारांना आयतीच संधी मिळते आहे. त्यातून मुलींचे, महिलांचे फोटो माॅर्फिंगचे प्रकार घडू लागले आहेत. अशा प्रकारचे राज्यात सायबर गुन्ह्यातही वाढ होताना दिसत आहे. सोलापुरातही अशा घटना घडल्या आहेत.

सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्र डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाईल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो, समाजमाध्यमांवर स्वत:चा फोटो ‘डीपी’ ठेवताना सजग राहा, तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे कुणी मार्फिंग तर करीत नाही ना? हेदेखील तपासा, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, अमरावती, नांदेड आदी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. तरुणी व महिलांचे फोटो मॉर्फिंग केले जात आहेत. त्यामुळे फोटो ठेवताना विचार करण्याची वेळ आली आहे.

 

समाज माध्यम हे गुन्हेगारांचे अस्त्र ?

० या क्षेत्राचा दैनंदिन जीवनात अधिक वापर होऊ लागल्याने गुन्हेगार सायबर गुन्ह्यांकडे वळले आहे. समाज माध्यम म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर ही तर गुन्हेगारांसाठी खुली मैदानेच ठरत आहेत. बॅंकिंग फसवणूक, विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून फसवणूक करणे, फसवे ई-मेल पाठवणे या सर्व गुन्ह्यांबरोबरच एकंदर समाज माध्यम हे गुन्हेगारांचे अस्त्र बनत आहे. समाज माध्यमांपैकी व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा वापर अधिक प्रमाणात केल्या जात आहे.

असा होईल गुन्हा दाखल

० मॉर्फिंग म्हणजे मूळ चित्रामध्ये बेकायदेशीरपणे केलेले बदल, बनावट खातेधारक महिलांची चित्रे डाऊनलोड करून त्यामध्ये बदल करून ती दुसऱ्या वेबसाईटवर पुन्हा पोस्ट करतात. असे करणे हा आयटी ॲक्ट २००० अंतर्गत गुन्हा आहे. भादंविच्या कमलाखालीही गुन्हेगाराला अटक होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये भादंविचे कलम ३५४, ३५४ ड, व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.

हे घ्या उदाहरण

० सोलापुरात २०२० मध्ये एका तरुणीचा फोटो माॅर्फिंग करून त्याचे रूपांतर अश्लील चित्रात करण्यात आले होते. चेहरा तरुणीचा होता, मात्र तिचा खालील भाग एका अर्धनग्न हिरोईनचे होते. हा मॉर्फिंग केलेला फोटो फेसबुकवर पोस्ट केली होती. या प्रकारामुळे तरुणीची बदनामी झाली, अशी तक्रार सायबर पोलिसांत नोंदविली होती. पोलिसांनी एका यूआरएलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

महिलांची किंवा तरुणींची छायाचित्र डाउनलोड करून, अवमानना, बदनामी होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड केली जातात. बनावट प्रोफाईल बनविले जातात. त्यामुळे तरुणी, महिलांनी ‘डीपी’ ठेवण्याबाबत सावध राहिले पाहिजे.

- निलकंठ राठोड, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल, सोलापूर शहर

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया