शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Interview ; शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल : संजीव माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 7:16 PM

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त ...

ठळक मुद्दे‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शनशेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एकरी १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल, असा विश्वास कृषिभूषण संजय माने (आष्टा, जि़ सांगली) यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’त तिसºया दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

सतत २० वर्षे एकरी १०० मे़ टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणारे डॉ़ संजय माने म्हणाले, मी १९८८ पासून ऊस शेती करतोय, पूर्वी लागणीचा १८ ते २० मे़ टन तर खोडवा १० मे़ टनच उत्पादन होत होते़ परंतु ऊस उत्पादनवाढीसाठीचे तंत्रज्ञान समजून घेऊन विद्यापीठ, विविध संस्थांमधील विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.

१९९६-९७ साली प्रथम एकरी १०० मे़ टन उसाचे उत्पादन घेतले़ तेव्हापासून मागे कधी वळून पाहिलेच नाही़ प्रत्येकवर्षी १०० टनापेक्षा जास्त असे सलग २० वर्षे उत्पादन घेत आहे़ त्यांच्या भाषणातील एकेक शब्द ऐकताना लोकमत अ‍ॅग्रोत्सवातील उपस्थित शेतकरी आश्चर्यचकित होत होते, पण डॉ़ माने यांनी यात आश्चर्य असे काहीच नाही. तुम्हीही १०० मे टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेऊ शकता हे त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत शेतकºयांना विविध उदाहरणे देऊन सांगितले़ शेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

उसाची लागवड पद्धत...- जमीन सुपीक करण्यासाठी एकरी ४० गाड्या शेणखत, ३ ते ४ टन गांडूळ खत, करंजी, एरंडी, लिंबोणी पेंड, लेंडी खत, हिरवळीचे खत, मळी ५ ते १० टन आदीपैकी जे शक्य असेल ते खत जमिनीन गाडावे़ त्यानंतर ४ ते ५ फूट सरी सोडून दीड ते तीन फूट अंतरावर एक डोळा पद्धत लागवड करावी़ एकरात कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ६० हजार उसाचे प्रमाण असावे़ तरच उसाच्या पाल्याला सूर्यप्रकाश मिळू शकते आणि उसाची वाढ होते़ शिवाय फुटवा कमी करण्यासाठी बाळभरणी करणे गरजेचे आहे़  शिवाय उसाला थोडंथोडं सारखं सारखं सतत पाणी देणे गरजेचे असल्याचे संजीव माने यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी