आठ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अश्लील वर्तन

By विलास जळकोटकर | Updated: January 31, 2024 17:58 IST2024-01-31T17:58:10+5:302024-01-31T17:58:39+5:30

सोलापूर : जिला भलभुरंही कळत नाही अशा आठ वर्षाच्या निष्पाप मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून एका तरुणानं तिच्याशी अश्लील वर्तन ...

Indecent behavior by luring an eight-year-old girl with chocolate | आठ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अश्लील वर्तन

आठ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अश्लील वर्तन

सोलापूर : जिला भलभुरंही कळत नाही अशा आठ वर्षाच्या निष्पाप मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून एका तरुणानं तिच्याशी अश्लील वर्तन करण्याची धक्कादायक घटना शहरातील एका परिसरात मंगळवारच्या रात्री पावणेआठच्या सुमारास उघडीस आली. या प्रकरणी शिवानंद कंचे या तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळासह ॲट्रॅसिटीचा गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत पीडितेच्या आईनं म्हटले आहे की, यातील फिर्यादी ही पीडितेसह शिलाईकाम करुन आपली उपजिविका भागवते. मंगळवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान, नमूद आरोपीने ८ वर्षाच्या पीडितेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी अश्लील वर्तन केले. याबद्दल कोणाही सांगू नको असे डोळे वटारुन भीती दाखवली.

या प्रकाराबाद्दल पीडित मुलीने आईला येऊन झाला प्रकार सांगितला, यावर फिर्यादी तिच्या सोबत अन्य एका मानलेल्या बहिणीला घेऊन नमूद आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेली. यावर आरोपी दोघींना मारायला अंगावर धाऊन आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि चौधरी, कडू यांनी भेट देऊन माहिती घेतली. गुन्हा नोंदवून घेतला. पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Indecent behavior by luring an eight-year-old girl with chocolate