शाळकरी मुलीशी अश्लिल वर्तन; आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा
By रवींद्र देशमुख | Updated: November 30, 2023 16:59 IST2023-11-30T16:58:55+5:302023-11-30T16:59:29+5:30
अल्पवयीन शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी अश्लिल वर्तन करण्याची घटना सोलापुरमध्ये घडली.

शाळकरी मुलीशी अश्लिल वर्तन; आरोपीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा
सोलापूर : शाळेतून घराकडे पायी चालत निघालेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी अश्लिल वर्तन करण्याची घटना शहरातल्या एका परिसरात घडली. या प्रकरणी अजय कुरमय्या पिडूरकर याच्याविरुद्ध भा. द.वि. ३५४ सह बाललैंगिक छळाचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदला आहे.
याबाबत शाळकरी मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी भंगार गोळा करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची अल्पवयीन मुलगी घरापासून जवळच असलेल्या एका शाळेत जाते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ती शाळा सुटल्यानंतर चालत घराकडे चालली होती. वाटेत आरोपीने तिला गाठले. तिचा हात पकडून माझ्यासोबत चल म्हणत लज्जास्पद वर्तन केले. त्याला चुकवून पिडित मुलगी घरी आली. तिने वडिलास सदरचा प्रकार सांगितला.
या प्रकरणी पिडितेच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने वरील आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला. पुढील तपास फौजदार वळसंगे करीत आहेत.