शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

सोलापूरकरांसाठी वाढतं प्रदूषण ठरतंय धोकादायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:47 PM

जागतिक पर्यावरण दिन ; नागरिकांनो सावधान, दूषित पाणी, वायू अन् ध्वनी प्रदूषणही गाठतेय कळस

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यामध्ये शुष्क काटेरी वनाचा प्रकार आहेकडुलिंब, खेर, बाभूळ, हीवर अशी झाडे जास्त प्रमाणात आहेत२०१७ मध्ये जिल्ह्यात ९ लाख ३६ हजार १३८ झाडे लावण्यात आली

सोलापूर : हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत सोलापूर शहराचा राज्यात अकरावा क्रमांक आहे. शहरातील धुळीचे प्रमाण, झाडांची घटती संख्या व वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे  हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. सोलापूरकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या जिल्ह्यात झाडे कमी झाल्याने बनलेल्या ओसाड माळरानामुळे प्रदूषणात वाढ होत असून, हाच डाग ठरत आहे.

 केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्रदूषित असलेल्या देशातील १०२ शहरांना प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले होते. यात राज्यातील मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबादसह सोलापूरचाही समावेश आहे. राज्याच्या या यादीत सोलापूरचा क्रमांक अकरावा आहे.  सोलापूर  शहरात तीन जून रोजी सरासरी विहित मर्यादेच्या आत प्रदूषण असल्याचे प्रदूषण नियंत्रण  मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून सांगण्यात आले. प्रदूषणाची मर्यादा ही पी.एम. २.५, ६० मायक्रोग्रॅम  पर क्युबिक मीटर इतकी असते.   शहरात कुठेही कचरा जाळण्यात येतो. यावर नियंत्रण असल्याचे दिसत नाही. तसेच असे करणाºयांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

कचरा जास्त झाल्याने तो जाळण्याकडे शहरातील नागरिकांचा कल असतो. कचºयामध्ये प्लास्टिकचे प्रमाण जास्त असणे हे देखील प्रमुख कारण आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याने लोक स्वत:ची वाहने वापरतात. दुचाकीच्या माध्यमातूनही प्रदूषण जास्त  होते. यावर निर्बंध नाहीत. प्रवास करण्याच्या पर्यायी व्यवस्थांचीही तीच अवस्था आहे. काही मेट्रो शहरांमध्ये सायकलींचा वापर करण्यात येतो. त्यासाठी स्वतंत्र टॅÑकसुध्दा तयार करण्यात आला आहे. अशा पद्धतीची सोय सोलापूर शहरात नाही. शहरामध्ये धुलीकण जास्त असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.  राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, सोलापूर महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुुरु आहेत. 

खोदाईमुळे होणार नागरिकांना त्रासनगरोत्थान योजनेतून कामे करुन घेताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने घरे आणि रस्ता यांच्यातील उंचीबाबत काळजी घेतली नाही. घरे खाली आणि रस्ते वर अशी परिस्थिती अनेक भागात पाहायला मिळते. मुसळधार पाऊस झाला की अनेक भागांमध्ये पाणी साचते. नालेसफाईची कामे व्यवस्थित होत नाहीत, अशा तक्रारी ऐकायला मिळतात. पण यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना फारसा त्रास सहन करावा लागणार नाही, अशी ग्वाही महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे.  

मान्सूनपूर्व नियोजनासाठी महापालिका आयुक्त दीपक तावरे, नगर अभियंता संदीप कारंजे यांनी मागील महिन्यात बैठक घेतली होती. या बैठकीत आपत्कालीन कामांची जबाबदारी प्रमुख अधिकाºयांवर सोपविण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. 

शहर-हद्दवाढ भागात स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून भुयारी गटार, पाणीपुरवठा लाईनची कामे सुरू आहेत. या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. महापालिकेने काळजी घेणे गरजेचे आहे. 

एका एसीऐवजी एक झाड लावणे गरजेचेसोलापूर : एका सर्वेक्षणानुसार शहरात यंदाच्या उन्हाळ्यात ३४ हजार ए.सी. विकले गेले. याऐवजी ३४ हजार झाडे लावल्यास पर्यावरणाची स्थिती सुधारेल, असे मत नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे संचालक भरत छेडा यांनी व्यक्त केले. शहरात धुलीकणामुळे जास्त प्रदूषण होते. यात वाहने, एसी  यांच्यामुळे वातावरण उष्ण बनत चालले आहे.  याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शहर व जिल्ह्यात सात ते आठ महिना उन्हाळा असतो. या उन्हाचा वापर सौरऊर्जा तयार करण्यासाठी होत नाही. कोळसाऐवजी अशा पर्यायांचा वापर केल्यास हवामान चांगले राहील. मनुष्य जगताना फार मर्यादित विचार करतो. आपल्या भावी पिढीसाठी पर्यावरण राखणे आपले कर्तव्य आहे.

ध्वनी प्रदूषणाचा विचार  करता आज शहरात रात्री बारा वाजताही फटाके वाजतात. तर डीजे सिस्टीमचा वापरही वाढत आहे. रस्त्यावरुन जाणाºया वाहनांच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे.

झाडे किती लावली?

  • - सोलापूर जिल्ह्यामध्ये शुष्क काटेरी वनाचा प्रकार आहे. कडुलिंब, खेर, बाभूळ, हीवर अशी झाडे जास्त प्रमाणात आहेत. राज्यामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्र म घेण्यात येतो. यात सोलापूर विभागानेही सहभाग घेतला आहे.
  • - २०१७ मध्ये जिल्ह्यात ९ लाख ३६ हजार १३८ झाडे लावण्यात आली.  २०१८ मधील पावसाळ्यात २४ लाख ५४ हजार ८४ झाडे लावण्यात आली.
  • - २०१७ मध्ये लावण्यात आलेल्या झाडांपैकी ६९.७९ टक्के झाडेच जगली. तर २०१८ मध्ये लावण्यात आलेल्या झाडांपैकी ७०.२० टक्के झाडे जगली आहेत हा अहवाल डिसेंबर २०२८ पर्यंतचा आहे. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने जिवंत झाडांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.
  • - २०१८ मध्ये १९ लाख २० हजार झाडे लावण्याचा संकल्प सोलापूरच्या वन विभागाने केला आहे. 
  • - इतर सरकारी विभागाच्या माध्यमातून ८५ लाख ५२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत़
टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentवातावरणwater pollutionजल प्रदूषण