सोलापुरात सराफ, विधिज्ञ अन् हॉटेल व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी
By आप्पासाहेब पाटील | Updated: November 19, 2025 14:17 IST2025-11-19T14:17:07+5:302025-11-19T14:17:27+5:30
छाप्यानंतर पोलिसांनी सराफ बाजारात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सोलापुरात सराफ, विधिज्ञ अन् हॉटेल व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सराफ बाजारातील ज्वेलर्सवर पुणे, कोल्हापूर विभागाच्या आयकर विभागाने अचानक छापा टाकला. छाप्यानंतर पोलिसांनी सराफ बाजारात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, सराफ बाजारातील दोन ज्वेलर्सवर छापा पडला आहे. सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. चित्रीकरण करताना माध्यमांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे काही काळ त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील रस्ते बंद करून बंदोबस्त वाढविला आहे. ज्वेलर्सवर व त्यांच्या घरावरही छापा टाकून तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे. साेलापुरातील प्रसिध्द विधिज्ञ व एका हॉटेल व्यावसायिकांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.