सोलापुरातील घटना; चालत्या रेल्वेतून तो खाली पडला; रेल्वे पोलिसांनी त्याचा जीव वाचविला
By Appasaheb.patil | Updated: August 17, 2022 17:04 IST2022-08-17T17:04:35+5:302022-08-17T17:04:41+5:30
सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना

सोलापुरातील घटना; चालत्या रेल्वेतून तो खाली पडला; रेल्वे पोलिसांनी त्याचा जीव वाचविला
सोलापूर : स्थळ सोलापूररेल्वे स्थानक...वेळ १ वाजून ५४ मिनिटे...राजकोट-कोईमतूर एक्स्प्रेस...चालत्या रेल्वेतून एक प्रवासी खाली उतरताना तो स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर पडला...याचवेळी रेल्वेखाली जाण्यापासून त्या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचविले अन् त्याला जीवदान दिल्याची घटना घटना सोमवार, दि. १५ ऑगस्ट रोजी घडली.
दरम्यान, १५ ऑगस्ट २०२२ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गगन पाल हे बंदोबस्तावर होते. याचवेळी राजकोट-कोईमतूर एक्स्प्रेस सोलापुरात दाखल होता, गाडीचा वेग कमी करण्यात आला होता. एक प्रवासी घाईघाईने उतरण्यासाठी धडपड करीत असताना चालत्या गाडीतून तो प्लॅटफॉर्मवर पडला. याचवेळी बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलीस गगन पालने त्याला वेळीच ओढून रेल्वेखाली जाण्यापासून रोखले अन् जीव वाचविले. त्यामुळे प्रवाशाला कोणत्याही प्रकारची इजा व जखम झाली नाही. पंकज भोसले (४०, रा. उत्तर कसबा, सोलापूर) असे जीव वाचलेल्या प्रवाशाचे नाव आहे. पंकज हे पुण्याहून सोलापुरात दाखल झाले होते. रेल्वे पोलिसांच्या या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.