मोठी बातमी! डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:31 IST2025-06-24T12:30:56+5:302025-06-24T12:31:18+5:30

या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

In Solapur Dumper hits two-wheeler; Three youths die on the spot | मोठी बातमी! डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू

सोलापूर : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील दोड्डी फाट्याजवळ २४ जून २०२५ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

देविदास दुपारगुडे (वय ४०), नितीन वाघमारे (वय ३५), हनुमंत राठोड (वय ४०) हे सर्वजण मुस्ती तांडा (ता. द. सोलापूर) येथील रहिवाशी आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, धोत्री ते मुस्तीमार्गे भरधाव वेगात डंपर निघाला होता. समोरून तीन युवक दुचाकीवर बसून हैद्राबाद महामार्गाकडे येत असताना दुचाकी व डंपरची समोरासमाेर धडक झाली.

या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.  या अपघाताची माहिती मिळताच मुस्ती तांडा परिसरातील लाेकांनी शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी केली आहे.

Web Title: In Solapur Dumper hits two-wheeler; Three youths die on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात