धक्कादायक.. सोलापुरात दारुच्या नशेत तरुणाकडून गळा कापून घेण्याचा प्रयत्न

By विलास जळकोटकर | Updated: March 14, 2024 16:40 IST2024-03-14T16:40:06+5:302024-03-14T16:40:37+5:30

जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू सहदेव गायकवाड (वय- ३२, रा. गांधी नगर भाग ६, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

In Solapur an intoxicated youth attempted to cut his throat | धक्कादायक.. सोलापुरात दारुच्या नशेत तरुणाकडून गळा कापून घेण्याचा प्रयत्न

धक्कादायक.. सोलापुरात दारुच्या नशेत तरुणाकडून गळा कापून घेण्याचा प्रयत्न

सोलापूर : दारुच्या नशेमध्ये एका तरुणानं तीक्ष्ण असलेल्या पत्र्याच्या सहाय्यानं स्वत:चा गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील गांधी नगर भाग ६ मध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू सहदेव गायकवाड (वय- ३२, रा. गांधी नगर भाग ६, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

यातील जखमी तरुणाने बुधवारी रात्री दारु प्राशन केलेली होती. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याने नशेमध्येच घरामध्ये असलेल्या तिक्ष्ण पत्र्याच्या सहाय्यानं स्वत:च्या गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या गळाला जखम झाली. रक्तबंबाळ झाल्यानं त्याचा भाऊ लखन गायकवाड याने तातडीने वाहन करुन सकाळी ६:२० च्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
डॉक्टरांनी उपचार सुरु केले. त्याची प्रकृती स्थिर असून, तो शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले. असे कृत्य करण्यामागचे नेमके कारण काय असावे याचा पोलिस शोध घेत आहेत. सिव्ही पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: In Solapur an intoxicated youth attempted to cut his throat