- राजकुमार सारोळेसोलापूर : लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर महाराज येऊ दे, नाहीतर आणखी कोणी पॉवरफुल्ल. लोकसभेचे निवडणूक रणांगण मला नवीन नाही. युद्धभूमीत कोण येतो, कोण जातो, सामना तर करायला लागतोच, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.काँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मंगळवारी सोलापुरात आगमन झाले. ‘जनवात्सल्य’ निवासस्थानी बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या निवडणुकीसारखा मी आता गाफील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी सोलापुरातील जाहीर सभेत यंत्रमागाचे उदाहरण दिले होते. टेक्स्टाईल इंडस्ट्री इतकी मोठी असताना शिंदे यांनी काय केले, अशी टीका त्यांनी केली होती. हम करेंगे असे आश्वासन देऊन साडेचार वर्षांत एक मीटर कापड खरेदी केलेले नाही. मोदींची आश्वासने फेल गेली आहेत. या निवडणुकीत याचाच जाब मी विचारणार आहे.
लोकसभेचे रणांगण मला नाही नवीन - शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 06:23 IST