"मी मुंडे साहेबांपेक्षा वेगळी अन् काळच ठरवेल मी त्यांच्या पुढची..."; पंकजा मुंडेंनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:59 IST2023-09-07T16:50:21+5:302023-09-07T16:59:35+5:30

माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे या शिव-शक्ती परिक्रमे दरम्यान गुरुवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आल्या होत्या.

"I am different from Munde Saheb and only time will decide I will be next to them..."; Pankaja Munde took darshan of Vitthal | "मी मुंडे साहेबांपेक्षा वेगळी अन् काळच ठरवेल मी त्यांच्या पुढची..."; पंकजा मुंडेंनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

"मी मुंडे साहेबांपेक्षा वेगळी अन् काळच ठरवेल मी त्यांच्या पुढची..."; पंकजा मुंडेंनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

सचिन कांबळे

पंढरपूर - मी मुंडे साहेबांपेक्षा वेगळी, अन् काळच ठरवेल मी त्यांच्यापेक्षा पुढची आहे असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य पंढरीत केले आहे. यामुळे पुढच्या काही दिवसात त्या भाजपापासून वेगळा निर्णय घेतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे या शिव-शक्ती परिक्रमे दरम्यान गुरुवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आल्या होत्या. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे, शंकुतला नडगिरे, नगरसेवक नवनाथ रानगट, गुरुदास अभ्यंकर यासह अनेक लोक उपस्थित होते.

पुढे मुंडे म्हणाल्या, लेकुरवाळा देव तसा लेकुरवाळा नेता असतो. त्या पद्धतीने मुंडे साहेब लेकुरवाळे होते. मी संघाच्या शिस्तीत वाढलेली आहे. शिव-शक्ती परिक्रमा ही कुठली यात्रा नाही. माझ्या बरोबर फक्त १५ लोक आहेत. परंतु यात स्वतः हून लोक सहभागी होत आहेत. यामुळे यास भव्य स्वरूप आले. परंतु ही यात्रा नाही. लोकांची गर्दी होते. यातून शक्ती प्रदर्शन होत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही.

Web Title: "I am different from Munde Saheb and only time will decide I will be next to them..."; Pankaja Munde took darshan of Vitthal