मोबाइलवर व्हिडिओ पाहून तसे संबंध ठेवण्यासाठी पतीचा हट्ट, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:15 PM2021-11-24T12:15:49+5:302021-11-24T12:17:01+5:30

विवाहिता ही पुरंदर तालुक्यातील निरा येथील राहणारी आहे. हल्ली ती करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये राहत आहे. फिर्यादी विवाहितेचा पती निरा येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे

Husband's insistence wife on watching sexual videos on mobile, FIR Lodged in karmala solapur | मोबाइलवर व्हिडिओ पाहून तसे संबंध ठेवण्यासाठी पतीचा हट्ट, गुन्हा दाखल

मोबाइलवर व्हिडिओ पाहून तसे संबंध ठेवण्यासाठी पतीचा हट्ट, गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देविवाहित पीडितेला ‘तू या घरात राहायचे नाही, हे घर माझे आहे’, असे म्हणून पती व मामांकडून धमकी दिली जात होती. ‘तुझ्या आई- वडिलांकडून माझा भाचा (पती) व बहिणीला (सासू) समोरचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये’ असे म्हणून वारंवार त्रास दिला जात होता.

सोलापूर - पती मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ पाहून तसे शारिरीक संबंध ठेवायचा हट्ट करत होता. त्यास विरोध केल्याच्या कारणावरुन पत्नीला सातत्याने मारहाण करत त्रास देण्यात येत होता. तसेच, नवीन घर घेण्यासाठी माहेरहून 9 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणीही पतीने केली. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याच्या तक्रारीवरुन पती, सासू, दोन नणंद आणि मामाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

विवाहिता ही पुरंदर तालुक्यातील निरा येथील राहणारी आहे. हल्ली ती करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये राहत आहे. फिर्यादी विवाहितेचा पती निरा येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांचे लग्न झाल्यानंतर १५ दिवस व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पती व सासू यांनी घरातील कामकाजावरून किरकोळ कारणावरून घालून पाडून बोलणे व तुझ्या आई- वडिलांनी लग्नामध्ये पाहुणचार केला नाही. सोने कमी दिले. घरातील संसारोपयोगी वस्तू संपूर्ण दिलेल्या नाहीत. यावरून त्रास देण्यास सुरुवात केली.

विवाहित पीडितेला ‘तू या घरात राहायचे नाही, हे घर माझे आहे’, असे म्हणून पती व मामांकडून धमकी दिली जात होती. ‘तुझ्या आई- वडिलांकडून माझा भाचा (पती) व बहिणीला (सासू) समोरचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये’ असे म्हणून वारंवार त्रास दिला जात होता. दरम्यान, नगर जिल्ह्यातील शिर्डीमधील व नाशिक (देवळाली) नणंद निरा येथील घरी आल्यानंतर विवाहितेला म्हणायच्या की, ‘तू मोकळ्या हाताने आमच्या घरी आलेली आहे. तू तुझ्या आई- बापाकडून लग्नामध्ये काही एक चिज वस्तू आणलेल्या नाहीत. आमच्या भावाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी तू आई-वडिलांकडून नऊ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून शिवीगाळ करून धमकी देत पती व सासूला या दोन्ही नणंद या माझ्याशी व्यवस्थित वागायचे नाही, असे शिकवण देत असत. तसेच उपाशी ठेवून मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ करून तुला सोडचिठ्ठी देतो, असे म्हणून घरातून हाकलून दिले, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Husband's insistence wife on watching sexual videos on mobile, FIR Lodged in karmala solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.