Maratha Akrosh Morcha: ... अन् रणजितदादांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मारला हायवेवरच ठिय्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:56 IST2021-07-04T11:35:19+5:302021-07-04T12:56:39+5:30
राज्यसरकरच्या निषेधार्थ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली.

Maratha Akrosh Morcha: ... अन् रणजितदादांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मारला हायवेवरच ठिय्या !
सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चा मध्ये सामील होण्यासाठी अकलूज, माळशिरस, माढा, टेंभुर्णी भागातील मराठा समाज बांधव सोलापुरातील मोर्चात सहभागी होण्यासाठी येत असताना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी टेंभुर्णी येथे आंदोलकांना अडविले.
राज्यसरकरच्या निषेधार्थ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.