विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 04:33 PM2020-04-03T16:33:38+5:302020-04-03T19:54:07+5:30

पालकमंत्री जितेंद्र आव्हाडाचे विठ्ठलाला साकडे; संत चोखामेळा विठ्ठलाला निरोप पोहोचव...

How do you see the children who are sleeping in hunger? | विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

Next
ठळक मुद्देपालकमंत्री जितेंद्र आव्हाड सोलापूर जिल्हा दौऱ्यावरकोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा घेतला आढावाआरोग्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचना

पंढरपूर : सध्या महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या कोरोना विषाणूचा नायनाट करण्याची ताकद फक्त विठ्ठला तुझ्याकडेच आहे. तुला तुझी लेकरे उपाशीपोटी झोपलेली कसे बघवत आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढ असे साकडे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठलाकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाबाबत परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री जितेंद्र आव्हाड हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठलाचे कळस दर्शन, नामदेव पायरीचे दर्शन व संत चोखा महाराज यांच्या समाधीला नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी तडफडतोय, शेतमजुरांना काम नाही. रोजंदारीवर जाणारा कामगार अन्ना विना उपाशी झोपतोय. अनेक लोक बेघर झाले आहेत, त्यांना उपाशी झोपण्याशिवाय पर्याय उरला नाही. महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून बाहेर काढ. असे साकडे
महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने घालण्यासाठी मी  पंढरपुरात आलो आहे. परंतु विठ्ठलाचे मंदिर बंद असल्याने विठ्ठलाचा परमभक्त संत चोखा महाराज यांना नतमस्तक होऊन माझे साकडे विठ्ठलापर्यंत पोहोचव अशी विनवणी केली असल्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Web Title: How do you see the children who are sleeping in hunger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.