शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

हौसेने घर बांधलं... दिवाळीत लग्न लावायचं होतं, पण...; मुलाच्या अपघाती मृत्यूनं वडिलांना दुःख अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:19 AM

लॉकडाऊनमुळे कंपनीनं सुट्टी दिल्यानं दोन भाऊ घरी परतत होते; पण अपघातात त्यांचा मृत्यू झाला

केगाव बु. या छोट्याशा गावात विद्युतपंप दुरुस्त करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज आणि अल्पभूधारक शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल या दोघांचा शनिवारी रात्री पुण्यात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दोघांना जड अंत:करणाने मूळगावी स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांना शोक अनावर झाला होता.

जिल्ह्यातील अनेक मुले उच्चशिक्षित झाले की, हाताला काम मिळावे, या हेतूने आई-वडिलांना सोडून कामासाठी पुणे, मुंबई अशा शहरांत जातात. त्यातीलच हे दोन तरुण. पुणे येथे गेले होते. पंकज (वय २७), राहुल (वय २५) हे मागील तीन वर्षांपूर्वी भविष्य घडविण्यासाठी गाव सोडून गेेले. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने संचारबंदी जाहीर केली. पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या. कंपनी बंद, मेस बंद, मग या मुलांनी काय करावं? पर्याय एकच, संचारबंदी संपेपर्यंत गावाकडे जाणे. त्यानुसार, शनिवारी पंकज आणि राहुल दोघे दुचाकीवरून गावाकडे निघाले; पण रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.

पंकज हा इरप्पा देसाई यांचा मोठा मुलगा. मुलाचे लग्न करावे म्हणून हौसेने नातेवाइकांच्या मदतीने गावात घर बांधले. फरशीचे काम सुरू होते. दिवाळीत मुलाचे हात पिवळे करण्याच्या आतच पंकज वडिलांना सोडून गेला.

पत्नीनंतर आता मुलगाही गेला, आता कुणाकडे बघून जगावेसिद्धाराम देसाई यांच्या पत्नीचे हृदयविकाराने यापूर्वीच निधन झाले होते. आता ज्याच्याकडे बघून आशेने जगावे, तो मुलगाही गेला. आता कुणासाठी जगावे, अशी भावना सिद्धाराम देसाई यांनी व्यक्त केली.

तरुणाई बेचैनकेगावमधील तरुणांमध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज आणि राहुल या चुलत भावांनी घरच्यांना आणि गावातील काही मित्रांना फोनवरून गावाकडे येत असल्याचे सांगितले होते. आपले मित्र येणार असे वाटत असताना त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच सर्वच दु:खी झाले.

पोलीस कारवाईच्या भीतीने रात्रीच निघालेसंचारबंदीमुळे दिवसा पोलीस कारवाई करतील, या भीतीने रात्रीच ११ वाजून ५० मिनिटांनी काळेवाडीफाटा येथून हे बंधू दुचाकीवरून निघाले. अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डांगे चौकातील एका हॉस्पिटलजवळ येताच त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली अन् हे दोघे जागीच ठार झाले. पंकज हा पेटीएम कंपनीत इंजिनीअर म्हणून होता, तर राहुल हा कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.