शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

हॉटेलचे मालक सोलापुरी...किचनमधील वस्ताद मात्र नेपाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:11 IST

परप्रांतियांच्या साम्राज्यात सोलापूरची बाजारपेठ; वेटर अन् कॅप्टनच्या कामात बिहारी ठरलेत भारी !

ठळक मुद्देसोलापुरात जवळपास ८४ परमिट रूम आहेत, व्हेज-नॉनव्हेज असलेले जवळपास ३०० फॅमिली रेस्टॉरंट आहेत रोजच्या घरातील जेवण्याच्या चवीला कंटाळलेले सोलापूरकर कधी-कधी फॅमिलीसोबत हॉटेलमधील भोजनाचा आस्वाद घेतातअस्सल सोलापुरी जेवणापेक्षा पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियनसह अन्य प्रांतातील विविध पदार्थांची चव चाखण्यावर इथल्या ग्राहकांचा कल

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : सोलापुरात काही नाही... इथे खूप काही आहे... म्हणूनच नेपाळ देशातील बावर्चींनी इथल्या हॉटेल्समधील किचन रूमवर ताबा मिळविला आहे. आचारीचे काम असो अथवा ग्राहकांना सेवा देण्यासाठी वेटर असोत, बिहारीबाबूंसह अन्य प्रांतातील युवक सोलापूरच्या संस्कृतीत पूर्णत: समरस होऊन गेले आहेत. बावर्चींसह वेटर मंडळींंनी मराठी भाषा तर अवगत केली आहे. शिवाय हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांमुळे हे परप्रांतीय कन्नड, तेलुगू भाषाही बोलण्याचा प्रयत्न करताहेत. 

सोलापुरात जवळपास ८४ परमिट रूम आहेत. व्हेज-नॉनव्हेज असलेले जवळपास ३०० फॅमिली रेस्टॉरंट आहेत. रोजच्या घरातील जेवण्याच्या चवीला कंटाळलेले सोलापूरकर कधी-कधी फॅमिलीसोबत हॉटेलमधील भोजनाचा आस्वाद घेतात. अस्सल सोलापुरी जेवणापेक्षा पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियनसह अन्य प्रांतातील विविध पदार्थांची चव चाखण्यावर इथल्या ग्राहकांचा कल असतो. हाच धागा पकडून हॉटेल्स चालकांनी परप्रांतातील बावर्चींना अर्थातच आचाºयांना बोलावून घेतले. नेपाळसह पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, कर्नाटक आदी राज्यांमधील बावर्ची आणि वेटर इथल्या बहुतांश हॉटेलमध्ये दिसतात. 

एखाद्या हॉटेलमध्ये ग्राहक आला तर तो भट्टी खोलीतील आचारीस बोलावून घेतो आणि त्याच्या आवडी-निवडीनुसार पदार्थांची आॅर्डर देत असतोे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये परप्रांतीय वेटर आपली सेवा देताना ग्राहकांना तेज क्या मीडियम अशी विचारणा करूनच तो पदार्थांची यादी किचनमधील बावर्चीला देत असतो. कधी-कधी घरात मांसाहार न करणारे हॉटेलमध्ये येऊन मांसाहार पदार्थ खाणारे ग्राहकही कमी नाहीत. विशेषत:  फिश फ्राय, फिश करी, फिश क्रेप्सी यासह चिकन, मटनमधील विविध पदार्थ बनविण्यातही आचाºयांचा विशेष हातखंडा आहे. 

साब, हम अभी शोलापूरके हो गये...- जुळे सोलापुरातील एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तेथे नेपाळमधील चार बावर्ची किचन रूममध्ये पदार्थ बनविण्यात व्यस्त होते. प्रकाश कोहली सांगत होता, ‘साब, १५ साल पहले मै शोलापूरमे आया. उससे पहिले मुंबईमे केटरिंग का कोर्स किया. मै और मेरे तीन साथी मराठी बात करते है. हम अभी शोलापूरके हो गये. पवन कोहली, किसन कोहली आणि शिवा विश्वकर्मा हे गेल्या १५ वर्षांपासून सोलापुरात स्थायिक झाले आहेत. पैकी प्रकाश आणि किसन हे कुटुंबीयांसह इथेच वास्तव्य करत आहेत. 

स्वच्छतेवर अधिक भर...- हॉटेलमधील आचारी असतील अथवा परप्रांतीय वेटर. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून हे बावर्ची आणि वेटर डोक्यावर विशेष टोपी आणि हातमोजे घालूनच ग्राहकांना सेवा देत असतात. जेव्हा असे चित्र हॉटेलमध्ये दिसते तेव्हा ग्राहकांचे पाय आपोआप अशा हॉटेल्सकडे वळताना दिसतात. 

परप्रांतातील वेटर ठेवण्यामागे ग्राहकांचा आनंद हेच मुख्य कारण आहे. त्यांची प्यारी हिंदी भाषा आणि ग्राहक हेच दैवत हा त्यांचा दृष्टिकोन असल्यामुळे ग्राहक पैशाकडे कधीच पाहत नाहीत. उत्कृष्ट सेवा मिळत असल्याने ग्राहक आवर्जून हॉटेल्समध्ये हजेरी लावत असतात. -संजय इंदापुरे,उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य खाद्यपेय महामंडळ.

परप्रांतातील आचारी, वेटर नेहमीच वेळा पाळतात. एखादे काम मनापासून करण्याची त्यांची शैली असते. आम्ही सांगण्याच्या आधीच परप्रांतातील ही मंडळी स्वच्छतेवर भर देत असतात. त्यांच्या राहण्याची, जेवण्याची सोय होत असल्याने ते सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांवर खूश असतात.-सीताराम शिखरे, हॉटेल व्यावसायिक.

टॅग्स :SolapurसोलापूरhotelहॉटेलNepalनेपाळKarnatakकर्नाटक