Breaking; सोलापुरात गृहमंत्र्यांचा ताफा अडविला; युवा पँथरच्या कार्यकर्त्याची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:25 IST2020-06-27T15:22:51+5:302020-06-27T15:25:50+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रकार; पोलिसांनी तत्काळ घेतले कार्यकर्त्याना ताब्यात

Breaking; सोलापुरात गृहमंत्र्यांचा ताफा अडविला; युवा पँथरच्या कार्यकर्त्याची घोषणाबाजी
सोलापूर : महाराष्ट्रात दलितांवर होणारे अत्याचार थांबवावे... शासनाचा निषेध असो अशा घोषणा देत सोलापुरातील युवा पँथरच्या कार्यकर्त्यानी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला़ करण्यात आला. हा प्रकार शनिवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडला.
गृहमंत्री अनिल देशमुख हे दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले. गृहमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात येताच युवा पँथरचे अतिश बनसोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात दलितावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध असो... महाराष्ट्र सरकारचा निषेध असो...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी ऐकतात पोलिसांनी कार्यकर्त्याच्या दिशेने धाव घेतली. अतिश बनसोडे यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जवळच असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात नेले. पोलीस अधीक्षक कार्यालयातून पाच जणांना सदर बाजार पोलिस ठाण्यात नेले आहे.