सोलापुरात इराण-इस्रायल युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'! 'माकप'कडून ट्रम्प-नेतान्याहू यांच्याविरोधात आंदोलन; हिंदुत्ववाद्यांनीही दिल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:28 IST2026-03-04T15:27:05+5:302026-03-04T15:28:20+5:30

पोलिस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, माकप कार्यकर्त्यांनी परवानगी झुगारून आंदोलन सुरूच ठेवले होते.

High-voltage drama' of Iran-Israel war in Solapur 'CPI' protests against Trump-Netanyahu; Hindutva activists also gave slogans | सोलापुरात इराण-इस्रायल युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'! 'माकप'कडून ट्रम्प-नेतान्याहू यांच्याविरोधात आंदोलन; हिंदुत्ववाद्यांनीही दिल्या घोषणा

सोलापुरात इराण-इस्रायल युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'! 'माकप'कडून ट्रम्प-नेतान्याहू यांच्याविरोधात आंदोलन; हिंदुत्ववाद्यांनीही दिल्या घोषणा

सोलापूर: इराण आणि इस्रायलमधील यु्द्धाचा आजा सोलापूरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली माकपने आंदोलन पुकारले. या आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. यामुळे जिल्हा परिषद कार्यालयाचा 'पूनम गेट' परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी यावेळी दोन्ही बाजूच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

दुबईत अडकलेल्या मराठी लोकांना परत आणायला सरकार काय करतंय?; CM फडणवीसांनी A टू Z माहिती दिली

पोलिस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, माकप कार्यकर्त्यांनी परवानगी झुगारून आंदोलन सुरूच ठेवले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात काळे कपडे परिधान करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान 'नेतान्याहू मुर्दाबाद'च्या घोषणा देत ट्रम्प आणि नेतान्याहू यांचा पुतळा जाळण्यात आला. "युद्धविराम त्वरित करा," अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या

माकपाचे आंदोलन सुरू असतानाच तिथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी इस्रायलच्या समर्थनात आणि माकपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याने तणाव कमालीचा वाढला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

नरसय्या आडम यांनी अमेरिका आणि इस्रायलला युद्धखोर ठरवत त्यांनी इराणची पाठराखण केली आहे. दुसरीकडे, भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी फेसबुक पोस्टद्वारे इस्रायलला समर्थन दिले आहे.

परवानगी नसताना आंदोलन करणे आणि पुतळा दहन केल्याप्रकरणी पोलीस आता माकप नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title : सोलापुर में ईरान-इजराइल युद्ध का विरोध, समूहों में झड़प

Web Summary : सोलापुर में सीपीआई (एम) के नेतृत्व में ईरान-इजराइल संघर्ष के खिलाफ विरोध प्रदर्शन हुआ, जिसका हिंदू समूहों ने विरोध किया। झड़पें हुईं, जिसके कारण गिरफ्तारियां हुईं। सीपीआई (एम) ने अमेरिका और इजराइल की आलोचना की, जबकि एक भाजपा विधायक ने इजराइल का समर्थन किया। पुलिस अनाधिकृत विरोध की जांच कर रही है।

Web Title : Solapur Sees Iran-Israel War Protests, Clashes Erupt Between Groups

Web Summary : Solapur witnessed protests against the Iran-Israel conflict led by the CPI(M), opposed by Hindu groups. Clashes erupted, leading to arrests. CPI(M) criticized US & Israel, while a BJP MLA supported Israel. Police are investigating unauthorized protest.