शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

‘इलेक्शन वॉररूम’च्या जागेवरून भाजपच्या दोन गटात ‘छुपे वॉर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:09 PM

सोलापूर लोकसभेची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माढ्याची जबाबदारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टाकण्यात आली .

ठळक मुद्देआपल्या उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवताना प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपकडून ‘वॉररूम’ स्थापन करण्यात येणारगेल्या चार दिवसांपासून ‘वॉररूम’च्या जागेचा शोध कायम आहे. यावरून दोन गटांत कुरबुरी झाल्या आहेत. 

राकेश कदम

सोलापूर : आपल्या उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवताना प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपकडून ‘वॉररूम’ स्थापन करण्यात येणार आहे. पण गेल्या चार दिवसांपासून ‘वॉररूम’च्या जागेचा शोध कायम आहे. यावरून दोन गटांत कुरबुरी झाल्या आहेत. 

भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्यासाठी मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या प्रचार कार्यालयात एक वॉररूम असणार आहे. सहकारमंत्री गटातील नगरसेवकांनी यासाठी सम्राट चौकातील बसवंती मंगल कार्यालयाचा पर्याय सुचविला होता. या मंगल कार्यालयाचे उद्घाटन माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था असल्याने हे कार्यालय सर्वांच्या सोयीचे होईल, असे सांगण्यात आले. परंतु, बसवंतींच्या नावावर फुली मारण्यात आली. त्यानंतर प्रभात टॉकीजच्या शेजारील एका व्यावसायिक इमारतीतील जागा निश्चित करण्यात आली, पण या जागेत पाण्यासह इतर सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. 

त्यामुळे ही जागाही रद्द करण्यात आली. यानंतर शहरातील काही मंगल कार्यालये आणि व्यावसायिक जागांची पाहणी करण्यात आली आहे, पण दोन्ही गटांचे त्यावर एकमत झालेले नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी गजबजलेल्या ठिकाणातील जागा निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू           होता. किमान कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना गाड्या लावण्यापुरती जागा असू द्या, असेही दुसºया गटाकडून सांगण्यात आले. त्यावर सायंकाळपर्यंत खल सुरू होता. दोन गटांच्या या ‘छुप्या वॉर’मध्ये ‘वॉररूम’ची जागा निश्चित झालेली नव्हती.

‘संघ’ प्रतिनिधी राहणार दक्ष! - सोलापूर लोकसभेची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माढ्याची जबाबदारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टाकण्यात आली असली तरी दोन्ही मतदारसंघातील हालचालींवर भाजपची ‘संघटन’ शाखा लक्ष ठेवणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. ‘वॉररूम’मधून सोशल मीडिया, प्रचार यंत्रणा, बैठका, जाहीर सभा आदींच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. 

महायुतीच्या सर्वच नेत्यांना सोबत घेणार- महायुतीचा मेळावा नुकताच हेरीटेज गार्डनमध्ये झाला. या मेळाव्यात केवळ भाजपचे झेंडे होते. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण पुढील काळात होणाºया मेळाव्यांमध्ये भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं (आठवले) गटाचे कार्यकर्ते असावेत, त्यांचे झेंडे लावावेत, यासाठी प्रयत्न राहणार आहेत. भाजपचे सहनिवडणूक प्रमुख किशोर देशपांडे म्हणाले, पुढील दोन दिवसांत मंडलनिहाय बैठका होतील. त्यानंतर महायुतीचा मेळावा होईल. त्यानंतरच जाहीर सभांचे नियोजन करण्यात येणार आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊनच कार्यक्रम होणार आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख