सोलापुरात जोरदार पाऊस; बाजारपेठांमध्ये साचले पाणीच पाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 14:27 IST2020-06-16T14:19:30+5:302020-06-16T14:27:58+5:30

शहरातील रस्ते झाले जलमय; सखल भागात साचले पाणी...

Heavy rains in Solapur; Water in the markets ... | सोलापुरात जोरदार पाऊस; बाजारपेठांमध्ये साचले पाणीच पाणी...

सोलापुरात जोरदार पाऊस; बाजारपेठांमध्ये साचले पाणीच पाणी...

ठळक मुद्दे- सोलापूर शहरात पावसाची हजेरी- ग्रामीण भागातील पाऊस पेरणीसाठी लाभदायक- पावसाच्या पाण्याने शहरातील रस्ते जलमय

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध भागात मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच पावसाला सुरूवात झाली. कधी संततधार तर कधी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरातील बाजारपेठा, भाजीमंडई, रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मंगळवारी पहाटेपासूनच आकाशात ढग साचले होते, गारवाही जोरात सुटला होता. ग्रामीण भागातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर आदी तालुक्यातील काही भागात पावसाने सकाळी आठ वाजल्यापासूनच हजेरी लावली होती. दरम्यान, एक ते दोन तास पावसाची रिपरिप सुरूच होती. सकाळी अकराच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठांमधील ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे तासभर कधी संततधार तर कधी जोरदार पाऊस पडत होता. दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील विविध भागात पाऊस सुरूच होता. त्यामुळे रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचले होते.

Web Title: Heavy rains in Solapur; Water in the markets ...