मुंबईत जोरदार पाऊस; सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 13:08 IST2021-07-18T13:08:22+5:302021-07-18T13:08:54+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Heavy rains in Mumbai; Express trains running from Solapur division canceled | मुंबईत जोरदार पाऊस; सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

मुंबईत जोरदार पाऊस; सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे रेल्वे ट्रॅक वर पाणी साचले आहे, सध्या विशेष एक्सप्रेस धावत असलेल्या गाड्या रद्द/आंशिक रद्द करण्यात आल्या आहेत. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची नावे पुढीलप्रमाणे- 
1. यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2021 रोजी गाडी क्रमांक 01027 दादर- पंढरपूर विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

2. यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2021 रोजी गाडी क्रमांक 02207  मुंबई-लातूर विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

3. यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2021 रोजी गाडी क्रमांक 01139 मुंबई गदग विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

4. यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2021 रोजी गाडी क्रमांक 02702 मुंबई- हैदराबाद विशेष एक्सप्रेस ही गाडी मुंबई स्थानका ऐवजी ठाणे स्थानक वरून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल.

5. यात्रा प्रारंभ दिनांक 17.07.2021 रोजी गाडी क्रमांक 02702 हैद्राबाद-मुंबई विशेष एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावेल आणि सदर गाडी,  गाडी क्रमांक.07031 मुंबई हैदराबाद विशेष एक्सप्रेस म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.

6. यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2021 रोजी गाडी क्रमांक. 01014 कोईमतुर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस कोईमतुर स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत म्हणजे सकाळी 08.55 वाजता सुटण्या ऐवजी सदर गाडी दुपारी 12.15 वाजता सुटेल.

वरील गाड्या रद्द झाल्याचे लक्षात घेऊन प्रवाशाने रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Web Title: Heavy rains in Mumbai; Express trains running from Solapur division canceled