विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह सोलापुरात जोरदार पाऊस

By Appasaheb.patil | Updated: April 20, 2024 16:14 IST2024-04-20T16:13:54+5:302024-04-20T16:14:39+5:30

विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने सोलापुरात जोरदार हजेरी लावली. दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती.

Heavy rain in Solapur with lightning and force winds | विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह सोलापुरात जोरदार पाऊस

विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह सोलापुरात जोरदार पाऊस

सोलापूर : मागील दोन ते तीन दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या सोलापूरकरांना शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. शनिवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने सोलापुरात जोरदार हजेरी लावली. दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती.

दुपारनंतर सोलापूर शहरासोबतच अचानक परिसरात वातावरणात बदल झाला. आभाळात ढग दाटून आले होते. दुपारी अक्कलकोट भागात पावसाला सुरूवात झाली. तीन वाजल्यापासून शहरात वादळी वारे जोरात सुटले. साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण: वीस मिनिटे जोरदार पाऊस बरसत होता. भवानी पेठ, घोंगडे वस्ती भाजी मंडई परिसरात, होटगी रोड, कुमठा नाका, सात रस्ता, माेदी, सात रस्ता आदी परिसरात पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसानंतर पुन्हा सुर्यदर्शन झाल्याचे पहावयास मिळाले.

Web Title: Heavy rain in Solapur with lightning and force winds