सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?  

By Appasaheb.patil | Updated: April 20, 2023 16:47 IST2023-04-20T16:42:52+5:302023-04-20T16:47:55+5:30

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढला असून सोलापूरकर घामाघूम झाले आहेत.

heat increased in maharashtra solapur boy taking bath on road bike viral video social media | सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?  

सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?  

सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढला असून सोलापूरकर घामाघूम झाले आहेत. तापमानाचा पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे. उन्हाचा पाराच इतका वाढलाय की, सोलापूरचं शोलापूर झालयं आणि मग असं सोलापूरकरांना काहीतरी भन्नाट सुचतयं. दरम्यान, शहरातील सरस्वती चौकात चक्क सिग्नलवर थांबलेला दुचाकीस्वार उन्हामुळे चक्क आंघोळ करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरत होत आहे.

सोलापूर शहरातील सरस्वती चौकात सिग्नल आहे. या सिग्नलवर गाड्या थांबलेल्या आहेत. यात एक दुचाकीस्वार आपल्या मित्रासोबत आहे. गाडीवर पाठीमागे बसलेल्या मित्राने बादली अन् मग आणलेला आहे. शेकडो गाड्या सिग्नलवर थांबलेल्या असताना अचानक दुचाकीवरील एकानं बादलीतील पाणी अंगावर ओतून घेण्यास सुरूवात केली. स्वत:बरोबरच गाडी चालवित बसलेल्या मित्राच्याही अंगावर पाणी ओतत असतानाचा हा व्हिडिओ आहे.



हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहेत. आतापर्यंत लाखो लाईक्स व शेकडो लोकांनी या व्हिडीओला शेअर केले आहे. सोलापुरी कर्तृत्व..स्वस्त चमकोगिरी, ....बोलतो सुर्यदेवांशी...नेते काय तरी करा..सोलापूरकर रॉक्स.. अशा विविध कमेंटसही अनेकांनी पोस्ट केल्या आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: heat increased in maharashtra solapur boy taking bath on road bike viral video social media