शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सख्खा भाऊ पक्की मैत्री; अडीच एकरांत घेतले चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 16:11 IST

लिंबू उत्पादनातून दोघा भावांनी साधली किमया; मुंबईच्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव

ठळक मुद्देशेतीमध्ये वडिलांना मदत करत-करत विकास आणि प्रकाश यांनी शेती करण्यास सुरुवात केलीदोघांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले़ तिसरे बंधू गणेश हे पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालयात काम करताहेत२० बाय २० अंतरावर २५० झाडांची लागवड केली़ लागवड केल्यापासून तिसºया वर्षी प्रथम फळ तोडणीला सुरुवात झाली

 संभाजी मोटे 

वाळूज : वडिलांच्या २५ एकरात पारंपरिक पिकेच़़़ दोन बांधवांना वाटले प्रयोग करावा... अत्यल्प पाणी, मनुष्यबळ आणि कमी खर्चातल्या लिंबाची लागवड केली... मिश्रखते, निंबोणी खताच्या माध्यमातून तीन वर्षांनंतर पहिल्याच फळपिकाने चार लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे़ स्थानिक बाजार पेठेपेक्षा मुंबईतील वाशीच्या बाजारपेठेत एका डागाला ४०० रुपयांचा दर मिळाला. ही किमया साधली आहे मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) येथील आतकरे कुटुंबातील दोन बांधवांनी.

विकास आणि प्रकाश आतकरे असे त्या दोन बांधवांची नावे़ त्यांच्या वडिलांची पारंपरिक २५ एकर शेती आहे. परंतु ते जुन्या पद्धतीने ज्वारी, गहू, हरभरा, ऊस ही पिके घेत होते. शेतीमध्ये वडिलांना मदत करत-करत विकास आणि प्रकाश यांनी शेती करण्यास सुरुवात केली. दोघांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तिसरे बंधू गणेश हे पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालयात काम करताहेत.या दोन बंधूंनी पाच वर्षांपूर्वी कागदी लिंबाची अडीच एकरात लागवड केली़ २० बाय २० अंतरावर २५० झाडांची लागवड केली. लागवड केल्यापासून तिसºया वर्षी प्रथम फळ तोडणीला सुरुवात झाली. एप्रिल आणि मे माहिन्यात संपूर्ण बागेत वाढलेले तण काढून घेतले़ उन्हाळ्यामध्येच भरपूर शेणखत टाकले.

लिंबाचा हंगाम हा बारा महिने आहे. त्यामुळे दररोज पैसे मिळवून देणारे उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जाते़ लिंबावर डाग पडणे म्हणजेच (कँकर) हा मुख्य रोग आहे. तसेच मूळकुज (खोडकिडा) म्हणजे झाड वठणे हे प्रामुख्याने रोग येतात. या रोगावर मात करीत संपूर्ण २५० झाडं जगवली. नुआन कराटे, बाविस्टिन ही औषधे फवारून बाग जोपासली. मिश्र खते, निंबोणी खत, २६:२६ ही रासायनिक खते आणि शेणखत टाकून बाग वाढवली. वर्षभरात खुरपणी, रासायनिक खते, औषधे आणि शेणखत यांचा मिळून खर्च २५ हजार झाला. तसेच पहिल्याच वर्षी एकूण २० किलोप्रमाणे एक हजार डाग उत्पादन निघाले़ एका डागाला त्यांना ४०० रुपये दर मिळाला. एकूण वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपये मिळाले. निघालेला सर्व माल मुंबईच्या वाशी बाजारपेठेत विक्री पाठविला.

चमेली बोराचे आंतरपीक वडिलांच्या २५ एकर  शेतीतून काय पिके  घ्यायची, यावर आम्ही दोघा भावांनी नियोजन केले़ या बागेच्या जोरावरच चमेली वाणाच्या बोराचीही लागवड केली. तसेच शेती करत-करत  गावात दूध व्यवसाय चालू केला. लिंबाच्या माध्यमातून दररोज पैसे मिळतात़ त्यामुळे पैशाची अडचण केव्हाच जाणवली नाही़ लिंबामुळे आतकरे कु टुंबाच्या वैभवात भर पडली. 

कोणतेही पीक हे प्रयोगशील पद्धतीने घ्यावे. त्यामुळे नियोजन होते आणि भरपूर पीक घेता येते़ आज देगावमधल्या लिंबाला स्थानिक बाजारपेठ असतानाही वाशीच्या बाजारपेठेने चांगला दर मिळाला़ इतर नगदी पिकांपेक्षाही अधिक उत्पादन घेता आले ते केवळ नियोजनामुळे आणि प्रयोगशीलतेमुळे.

- विकास आतकरे, लिंबू उत्पादक 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल