शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Good News; तब्बल सात महिन्यानंतर उघडले जिमचे दरवाजे; पहिल्या दिवशी मिळाला उत्तम प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 9:09 AM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील जिम, फिटनेस क्लब व व्यायामशाळा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाल्या. तब्बल सात ते आठ महिन्यांपासून जिम सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या  फिटनेस इच्छुकांनी पहिल्या दिवशी जिममध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.

राज्य सरकारने 'सोशल डिस्टंसिंग'च्या अटींवर परवानगी दिल्यानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर  जिम सुरू झालेत. मात्र सणामुळे जिम चालकांनी साफसफाई करून पूजा केली. पहिल्या दिवशी फिटनेस इच्छुकांनी जिममध्ये येऊन नोंदणी केली. जिममध्ये व्यायाम करणारे सध्या पहाटे सायकलिंग, फिरणे असा व्यायाम करीत आहेत मात्र जिम बंद असल्याने वजन वाढले आहे तसेच

 हिवाळा सुरू झाल्याने हळूहळू मंगळवेढेकर गर्दी करतील, अशी आशा नर्मदा पार्क शिक्षक सोसायटी येथील ओम जीमचे संचालक व योगशिक्षक संतोष दुधाळ यांनी  व्यक्त केली. उशिरा का होईना जिमला परवानगी बहाल केल्याबद्दल त्यांनी सरकारला धन्यवाद दिले. त्यामुळे लॉकडाउनकाळात झालेले आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, असे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे सध्या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे येत्या काळात जिममध्ये गर्दी वाढणार असल्याचे सांगून, शासनाच्या निर्देशानुसार आम्ही नियमित सॅनिटायझेशन, मास्क, 'सोशल डिस्टंसिंग' इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचे संचालक नितीन मोरे यांनी सांगितले.

कोरोनामुळे छोटेमोठे जिम व फिटनेस क्‍लब या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला. केवळ जिम मालकच नव्हे, त्यावर उदरनिर्वाह असलेले प्रशिक्षक (ट्रेनर) व अन्य कर्मचारीही बेरोजगार झाले होते. या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता जिमला परवानगी मिळाल्याने लॉकडाऊनकाळात झालेले आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघेल- संतोष दुधाळ,संचालक, ओम जिम मंगळवेढा.

टॅग्स :SolapurसोलापूरFitness Tipsफिटनेस टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या