सांगोलामार्गे हैदराबादकडे निघालेला २० लाखाचा गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला

By Appasaheb.patil | Updated: September 25, 2022 18:58 IST2022-09-25T18:57:29+5:302022-09-25T18:58:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क

Gutkha worth 20 lakh was caught by the Sangola police on its way to Hyderabad via Sangola | सांगोलामार्गे हैदराबादकडे निघालेला २० लाखाचा गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला

सांगोलामार्गे हैदराबादकडे निघालेला २० लाखाचा गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला

सोलापूर/ सांगोला : रात्र गस्तीवरील सांगोला पोलिसांनी कर्नाटकातून सांगोलामार्गे औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणारा मालट्रक पकडून ट्रक मधून सुमारे २० लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला. ही कारवाई रविवार २५ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ३:३० च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील नवीन बायपास जवळ केली.

यावेळी चालक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर पोलिसांनी गाडीमधील गुटख्यांची पोती खाली उतरावून अन्न व औषध प्रशासनाला दाखविले. त्यानंतर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही सांगोला पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणा ऱ्या अनेक गाड्यांवर कारवाई केली आहे. रविवारी केलेली कारवाई सांगोला पोलिसांची सर्वात मोठी आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रॅकमधून गुटख्यांची पोती काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या कारवाईचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी कौतुक केले आहे. 

Web Title: Gutkha worth 20 lakh was caught by the Sangola police on its way to Hyderabad via Sangola