शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

गुरुजी अन् विद्यार्थीही सुटाबुटात; तिरवंडी, धर्मपुरी शाळेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 11:01 IST

 ब्लेझरचा कपडा अन् शिलाईचा खर्च ३२ हजार ४०० रुपये लोकसहभागातून

ठळक मुद्देझेडपी शिक्षकांच्या गणवेशाबाबत अनेक दिवस चर्चेचे गुºहाळ सुरूगणवेश कसा असावा, याबाबत शिक्षक संघटना व प्रशासनात चर्चा प्रशासनाच्या संकल्पनेच्या एक पाऊल पुढे चालणाºया शाळेतील शिक्षक व विद्यार्थी

माळशिरस : झेडपी शिक्षकांच्या गणवेशाबाबत अनेक दिवस चर्चेचे गुºहाळ सुरू आहे़ गणवेश कसा असावा, याबाबत शिक्षक संघटना व प्रशासनात चर्चा झाली, विरोधही झाला. अखेर चर्चेतून शिक्षकांना ब्लेझरचा गणवेश निश्चित केला, परंतु तिरवंडी (ता. माळशिरस) येथील बंडगरमळा झेडपी शाळेत तर चक्क जून २०१७ पासून तर धर्मपुरी येथील झेडपी शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून शिक्षक अन् विद्यार्थीही ब्लेझर वापरू लागले़ त्यामुळे प्रशासनाच्या संकल्पनेच्या एक पाऊल पुढे चालणाºया शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आहेत़ झेडपी शिक्षकांचे गणवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून दावे प्रतिदावे सुरू आहेत. अखेर दिवाळीनंतर शिक्षकांना ब्लेझर निश्चित केला असला तरी आता वकील संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या गणवेशाचे काय होणार? हा प्रश्नच आहे.

शिक्षण विभागाने गणवेशासाठी १ कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध केला; मात्र यात मोठ्या प्रमाणात  लोकवर्गणी करून शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शिक्षकांनी शाळेच्या भौतिक सुविधेबरोबरच विद्यार्थ्यांना टॉय, ओळखपत्र, स्पोटर््स गणवेश अशा विविध सुविधा होऊ लागल्या.

बंडगर मळा, धर्मपुरी या शाळेतील शिक्षकांची भविष्याचा वेध घेत झेडपीची मुले गुणवत्तेबरोबरच इंग्लिश स्कूलच्या तुलनेत कोठेही कमी पडू नयेत, याची काळजी घेतली़ त्यामुळे या शाळेत सध्या शिक्षक अन् विद्यार्थीही ब्लेझर वापरत असल्याचे दिसून येते.बंडगरमळा येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत एकूण २८ विद्यार्थी व दोन शिक्षक ब्लेझरमध्ये येतात तर धर्मपुरी येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून २३३ पटसंख्या आहे.

राजेंद्र भारुड यांचीच संकल्पना- डॉ़ राजेंद्र भारुड हे सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ९ मे २०१७ मध्ये रुजू झाले़ त्यानंतर आनंदनगर ( अकलूज) येथे एक शिक्षकांचाच कार्यक्रम झाला़ या कार्यक्रमात ते सहज बोलून गेले की झेडपी शाळेचा शिक्षक अन् विद्यार्थी माझ्यासारख्या ब्लेझरमध्ये दिसला पाहिजे़ ही संकल्पना तिरवंडी येथील मुख्याध्यापक तुकाराम वाघमोडे यांना आवडली़ त्यांनी लागलीच शालेय समिती अध्यक्ष शामराव बंडगर यांना सांगितली़ त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली़ त्याचप्रमाणे धर्मपुरी येथील शिक्षकांनाही वाटू लागले़ इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सुटाबुटात असतात़ मग आपला विद्यार्थी का नको़ विद्यार्थ्यांमध्ये गणवेशाविषयी उगीच न्यूनगंड नको म्हणून मुख्याध्यापक दत्तात्रय झेंडे आणि शालेय समिती अध्यक्ष विजय मसगुडेसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

दिवाळीनंतर गुरुजी होणार सर- गुरुजी’ या शब्दाला एक वेगळी धार आहे़ पांढरे धोतर, मोठा भिंगाचा चष्मा, काखेत शबनम पिशवी, हातात पुस्तक असा पेहराव असलेली एक विद्वान व्यक्ती म्हणजे गुरुजी़ शासकीय निर्णयानुसार १९ नोव्हेंबरपासून छोतर, पायजमा, पॅन्ट वापरणारे ‘गुरुजी’ ब्लेझरवाले ‘सर’ होतील़ ‘बाई’ ऐवजी ‘मॅडम’ याच नावाने आता विद्यार्थ्यांना हाक मारावी लागणार आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSchoolशाळाEducationशिक्षण