पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है'

By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 13, 2023 10:01 PM2023-01-13T22:01:39+5:302023-01-13T22:02:48+5:30

कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून ३० हजार घरकूल प्रकल्प साकार होत आहे.

Guardian Minister Vikhe-Patil said to Adam Master Hum Tumhare Saath Hai | पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है'

पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है'

Next

सोलापूर : माकपचे नरसय्या आडम यांच्यासोबत आमचे काहीही राजकीय मतभेद असोत, पण त्यांची भूमिका नेहमीच श्रमिकांच्या बाजूने असते. यामुळे आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेवूनक कुंभारी येथील रे नगरच्या तीस हजार घरकुलांचे काम पूर्ण करू. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी राहू, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी दिले.

कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून ३० हजार घरकूल प्रकल्प साकार होत आहे. पालकमंत्र्यांनी शुक्रवारी रे नगरला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण झाले. या प्रसंगी दहा घरकुल लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात एक लाख ९२ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. पालकमंत्र्यांच्याहस्ते धनादेश देवून लाभार्थींचा सत्कार झाला.

याप्रसंगी या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम, माजी नगरसेविका कामिनीआडम, माकपचे जिल्हा सचिव एम.एच. शेख. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद राऊत, म्हाडाचे सीईओ नितीन माने, जि.प.च्या सीईओ मनीषा आव्हाळे, एमजेपीचे अधिकारी उमाकांत माशाळे, बांधकाम खात्याचे अधिकारी महाजन, वीज वितरण कंपनीचे अधिकारी सांगळे आदी उपस्थित होते. रे नगर फेडरेशनचे सचिव युसूफ मेजर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर ॲड. अनिल वासम यांनी सूत्रसंचालन केले. फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबर्गुी यांनी आभार मानले.
 

Web Title: Guardian Minister Vikhe-Patil said to Adam Master Hum Tumhare Saath Hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.