शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. मा. पवार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 9:58 AM

प्रा. गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते. मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य व साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला आहे.

सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांचे आज पहाटे सोलापूर येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी साडेचार वाजता राहत्या घरातून भगवंत हाऊसिंग सोसायटी विजापूर रोडपासून निघणार आहे. तसेच पाच वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

दरम्यान, निधनाचे वृत्त समजताच राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गो. मा. पवार यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचयप्रा. गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते. मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य व साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला आहे. प्रा. पवार यांचा जन्म १३ मे १९३२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथे झाला. शालेय शिक्षण नरखेड येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरण मध्ये झाले. मराठी विषयातून एम. ए. चे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अध्यापनाच्या क्षेत्रात ३३ वषे सेवा केली. यात शासकीय महाविद्यालय अमरावती, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथेही अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून विपूल साहित्य निर्मिती केली.

पुस्तकेविनोद – तत्व व स्वरूपमराठी विनोद – विविध अविष्काररूपेनिवडक फिरक्यानिवडक मराठी समीक्षामहर्षी विठ्ठल रामजी शिंदे – जीवन व कार्यनिवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदेमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे – भारतीय साहित्याचे निर्मातेमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाड्मय खंड १ व २द लाईफ अँड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदेइ. पुस्तके लिहिली अथवा संपादित केली.

पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्लीभैरू रतन दमाणी पुरस्कार सोलापूरशिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डुवाडीरा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार , वाईपद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगरमहाराष्ट्र फौंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, मुंबईमहाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाड्मय पुरस्कार,धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, औरंगाबादशरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार सोलापूरमराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबादमराठी समीक्षेमध्ये विनोदाची सिद्धांतिक मीमांसा करणारे प्रा. गो. मा. पवार हे पहिले व एकमेव समीक्षक आहेत. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी आतापर्यंत १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर २२ विद्यार्थ्यांनी एम.फीलची पदवी प्राप्त केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSolapurसोलापूर