शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

राज्यात ११६ साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 12:55 PM

सर्वाधिक ऊस क्षेत्राची नोंद असलेल्या पुणे विभागात ४९ तर कोल्हापूर विभागातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. राज्यात उपलब्ध असलेल्या नऊ लाख दोन हजार ३५ हेक्टरपैकी पुणे व कोल्हापूर विभागात तब्बल पाच लाख १९ हजार ५१२ हेक्टर उसाची नोंद आहे. 

ठळक मुद्देएकूण १९३ कारखान्यांनी मागितला होता परवाना राज्यातील सहकारी १०० व खासगी ९३ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन अर्जएफ. आर.पी. न देणाºया साखर कारखान्यांना कदापिही गाळप परवाना मिळणार नाही

अरुण बारसकर आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : सर्वाधिक ऊस क्षेत्राची नोंद असलेल्या पुणे विभागात ४९ तर कोल्हापूर विभागातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. राज्यात उपलब्ध असलेल्या नऊ लाख दोन हजार ३५ हेक्टरपैकी पुणे व कोल्हापूर विभागात तब्बल पाच लाख १९ हजार ५१२ हेक्टर उसाची नोंद आहे. एक नोव्हेंबरपासून राज्यात साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात कारखाने  सुरळीत चालण्यासाठी आठवडा जाईल, असे सांगण्यात आले. शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांना पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही, असा इशारा दिल्यानेही कारखाने सुरू करण्यास अडथळा आहे. राज्यातील १९३ साखर कारखान्यांनी गाळप परवाना मागितला होता. त्यापैकी ११६ कारखान्यांना आतापर्यंत गाळप परवाना दिला आहे. उर्वरित साखर कारखान्यांचे परवाने प्रलंबित आहेत.  प्रलंबित ७५ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. दिली नाही, तर अन्य ५४ साखर कारखान्यांकडे शासकीय व कामगारांची देणी आहेत. एफ.आर.पी.ची रक्कम देणाºया साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.  शासकीय देणी देण्याबाबतचे  ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र देणाºया साखर कारखान्यांनाही गाळप परवाना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र एफ.आर.पी. न देणाºया कारखान्यांना परवाना मिळणारच नाही, असे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. पुणे विभागातील सातारा, पुणे व सोलापूर या तीन जिल्ह्यापैकी एकट्या सोलापुरात २८ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या अधिक आहे.---------------------------------एकूण १९३ कारखान्यांनी मागितला होता परवाना- पुणे विभागात सोलापूर, पुणे व सातारा हे जिल्हे असून, एकट्या सोलापूर जिल्ह्यात ३८ साखर कारखाने आहेत. कोल्हापूर विभागात सांगली, कोल्हापूर हे तर कारखाने नसलेल्या कोकणातील काही जिल्ह्यांचाही समावेश आहे. - राज्यातील सहकारी १०० व खासगी ९३ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज केला होता त्यापैकी ५७ सहकारी व ५९ खासगी कारखान्यांना गाळप परवाना दिला.- एफ.आर.पी. न दिलेल्या २१ कारखान्यांपैकी एकट्या सोलापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश असून, तीन कारखाने आर्थिक व अन्य कारणांमुळे सुरुच होणार नाहीत.------------------एफ. आर.पी. न देणाºया साखर कारखान्यांना कदापिही गाळप परवाना मिळणार नाही. कामगारांची देणी दिलीच पाहिजे. शासकीय देणी देण्याबाबत हमीपत्र दिले तर गाळप परवाना देऊ.- संभाजी कडू-पाटील,साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर