Good News; सोलापुरातील एक वर्षाच्या बर्थ डे गर्लने जिंकला ‘कोरोना’ विरूध्दचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:09 IST2020-05-22T12:03:28+5:302020-05-22T12:09:52+5:30

सिव्हिलमध्ये झाले होते सेलिब्रेशन; सोलापुरातील ३५ जणांनी केली ‘कोरोना’वर मात

Good News; The one-year-old Birthday Girl won the fight against Corona | Good News; सोलापुरातील एक वर्षाच्या बर्थ डे गर्लने जिंकला ‘कोरोना’ विरूध्दचा लढा

Good News; सोलापुरातील एक वर्षाच्या बर्थ डे गर्लने जिंकला ‘कोरोना’ विरूध्दचा लढा

ठळक मुद्देवाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यात तीन डॉक्टरांचा समावेश आईने कोरोनामुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांचे आभार मानले

सोलापूर : कोरोना वॉर्डामध्ये वाढदिवस साजरा झालेली एक वर्षाची चिमुकली गुरुवारी कोरोनामुक्त झाली. काही दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) कोरोना वॉर्डात साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुरुवारी एकूण ३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यात तीन डॉक्टरांचा समावेश आहे.

आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे तिच्या पालकांनी ठरविले होते. मात्र, त्या दरम्यान चिमुकलीला कोरोना झाला होता. चिमुकलीच्या वडिलांनी वाढदिवस साजरा करण्याची मागणी केली होती. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने डॉक्टरांनी परवानगी नाकारून तिचा वाढदिवस कोरोना वॉर्डातच साजरा केला होता. 

सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हीच चिमुकली गुरुवारी कोरोनामुक्त झाली. तिच्या आईने कोरोनामुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांचे आभार मानले.

Web Title: Good News; The one-year-old Birthday Girl won the fight against Corona