शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रडून नव्हे तर लढून हक्क मिळवा

By admin | Updated: June 25, 2014 01:39 IST

राजू शेट्टी: सांगोल्यात महायुतीचा एल्गार मेळावा

सांगोला : देशातील ६५ टक्के लोक शेती करतात, शेतकऱ्यांसाठी, दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पासाठी राज्यकर्ते पैसे नाही म्हणतात. मात्र त्यांच्याकडे निवडणुका लढविण्यासाठी, घोटाळे करण्यासाठी पैसे आहेत. शेतकरी आता जागा झाला आहे. शेतकऱ्यांना आता रडून काही मिळणार नाही तर लढून आपला हक्क मिळवा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.मंगळवारी सांगोला येथील शिवाजी चौक येथे महायुतीच्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आ. पाशा पटेल, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, उपसभपाती उत्तमराव जानकर, प्रा. जयंत बगाडे, संजय भगत, दीपक भोसले, श्रीकांत देशमुख, संजय पाटील-घाटणेकर उपस्थित होते. शेतीमध्ये शाश्वतता निर्माण झाली पाहिजे. आज शेतकऱ्यांच्या शेतीमालास, सिंचन प्रकल्पासाठी शासन पैसे देत नाही. मात्र हेच राज्यकर्ते निवडणुकांसाठी वारेमाप पैसे खर्च करतात. महाराष्ट्रात आज त्यांच्याच बँकांत अनेक घोटाळे होत आहेत. राज्याच्या सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना बाजूला करावे लागेल. आम्ही चळवळीतून निर्माण झालेले कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांनी संघटित प्रयत्न केल्यास दुष्काळावर मात करता येईल, असेही खा. शेट्टी म्हणाले.राज्यात शेतकरीविरोधी धोरणाने शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या श्रमाचा मोबदला मिळायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा विकास केला तसाच संपूर्ण देशाचा विकास करतील यात शंका नाही, असे माजी आ. पाशा पटेल म्हणाले. यावेळी भागवत नकाते, अ‍ॅड.नंदू यादव, नितीन बागल, दीपक भोसले, संजय बागल, जयंत बगाडे, श्रीकांत देशमुख यांची भाषणे झाली.----------------------------माढा मतदारसंघातील सर्व दुष्काळी जनतेने त्यांच्या मतदारसंघात मताधिक्य दिले आहे. सांगोला तालुक्याचे अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी संघटित होऊन लढू या. तालुक्याच्या हक्काचे २ टी.एम.सी. पाणी मिळावे यासाठीही लढावे लागेल.- सदाभाऊ खोतस्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष