मंगळवेढ्यात सोमवारी गौतमी पाटीलची लावणी; तिकिटाचा पैसा अनाथ मुलांसाठी खर्च करणार

By Appasaheb.patil | Updated: June 2, 2023 16:13 IST2023-06-02T16:12:37+5:302023-06-02T16:13:26+5:30

कार्यक्रमासाठी १०० ते १००० असा तिकिटदर ठेवण्यात आला असून ३५०० जणांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Gautami Patil Monday in Mangalvedha; Ticket money will be spent on orphans | मंगळवेढ्यात सोमवारी गौतमी पाटीलची लावणी; तिकिटाचा पैसा अनाथ मुलांसाठी खर्च करणार

मंगळवेढ्यात सोमवारी गौतमी पाटीलची लावणी; तिकिटाचा पैसा अनाथ मुलांसाठी खर्च करणार

सोलापूर : कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी संकलन हा हेतू ठेवून मंगळवेढ्यात युवकांनी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत आयोजक आदित्य हिंदुस्थानी यानी दिली.

५ जून २०२३ रोजी मंगळवेढ्यात हा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी १०० ते १००० असा तिकिटदर ठेवण्यात आला असून ३५०० जणांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यातून मिळणार्या पैशातून ५१ मुलांचा शिक्षणाचा खर्च करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. गौतमी पाटीलची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ वाढत आहे.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण हजेरी लावतात. अनेक व्हिडिओ देखील गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे व्हायरल होत असतात. त्यामुळे तिला अनेक ठिकाणी मागणी असते. यापूर्वीही सोलापूर जिल्ह्यात तिचे कार्यक्रम झाले होते मात्र या कार्यक्रमात राडा झाला होता. शिवाय बार्शा तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता. बहुतांश ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमाला पोलीस कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

Web Title: Gautami Patil Monday in Mangalvedha; Ticket money will be spent on orphans