ग्राहकांच्या बिलात बदल करून ३१ लाख २९ हजारांची फसवणूक; बार्शीत मॉलमधील सॉफ्टवेअरधारकाविरुद्ध गुन्हा 

By रवींद्र देशमुख | Published: April 22, 2024 05:21 PM2024-04-22T17:21:31+5:302024-04-22T17:22:50+5:30

बार्शीतून धक्कादाक प्रकार उघडकीस.

fraud of 31 lakh 29 thousand by changing the customer's bill in solapur | ग्राहकांच्या बिलात बदल करून ३१ लाख २९ हजारांची फसवणूक; बार्शीत मॉलमधील सॉफ्टवेअरधारकाविरुद्ध गुन्हा 

ग्राहकांच्या बिलात बदल करून ३१ लाख २९ हजारांची फसवणूक; बार्शीत मॉलमधील सॉफ्टवेअरधारकाविरुद्ध गुन्हा 

रविंद्र देशमुख, सोलापूर : बार्शी येथील एका मॉलमध्ये सॉफ्टवेअरचे नॉलेज असल्याचे सांगून कॅश ऑफिसर व सॉफ्टवेअर काम करणाऱ्यानेच गेल्या चार वर्षांत ग्राहकांच्या मूळ बिलात अदलाबदल करून ३१ लाख २९ हजार ४४३ रुपयांची अफरातफर करून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ४ जून २०१९ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली असून, भागीदार युवराज श्रीप्रसाद सोपल (वय २७, रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी युवराज सोपल, रत्नप्रभा सोपल, योगेश जोशी, विनीत मेहता, समृद्धी झंवर, महेश गुडे हे पाचजण भागीदारीत बार्शीत मॉल चालवत आहेत. व्यवहारासाठी एका कंपनीचे सॉफ्टवेअर घेऊन ते व्यवहार चालवत आहेत. हा व्यवहार पाहण्याकरिता आरोपीस कामावर घेतले. २०१८ पासून लिपिक पदावर राहून सर्व व्यवहार पाहत होता. या मार्टमध्ये दररोज १० ते १५ लाखांचा व्यवहार होतो. त्याच्यावर विश्वास ठेवून पडताळणी केली जात नव्हती. दिवसभर जमा झालेली रक्कम संजय वाघमारे यांच्याकडे जमा केली जात होती. त्यानंतर जून-२०२४ मध्ये मॉलच्या सर्व भागीदारांनी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे ठरवून या कंपनीच्या अभियंत्यास बोलावून त्याची पडताळणी केली. त्यात अफरातफर झाल्याचे सांगितले गेले. आरोपी हा सॉफ्टवेअर अपडेट करण्यास कधी कधी मुक्कामही करत होता. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासता तो पैसे चोरून खिशात घालत असताना दिसला. शिवाय कंपनीच्या माणसाला बिलाच्या रकमेत फेरफार करता येते का ? याबाबत विचारता त्यांनी करता येते सांगून त्याची ऑडिट समरी दाखवली. आरोपीकडे सॉफ्टवेअरचा आयडी पासवर्ड असल्याने ग्राहकाच्या बिलात अफरातफर करुन फसवणूक केल्याची खात्री झाली.

याप्रकरणी संकेत गौरीशंकर सोनवणे (रा. बार्शी) याच्याविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, तपास उपनिरीक्षक महेश गळगटे करीत आहेत.

Web Title: fraud of 31 lakh 29 thousand by changing the customer's bill in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.