शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

नोकरीचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक, सोलापूरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 10:40 IST

बाळे येथील व्यक्तीला गंडविले : पुण्याच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्दे रयत शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष ११ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्याच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : रयत शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्याच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार एप्रिल २०१५ मध्ये घडला. तीन वर्षे नोकरी लावण्याची प्रतीक्षा केल्यानंतर यासंदर्भात नागनाथ सुभाष क्षीरसागर (वय ५८, रा. शिवाजीनगर बाळे) यांनी ६ सप्टेंबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 या प्रकरणी किशोर तानाजी चव्हाण, त्याची पत्नी अर्चना किशोर चव्हाण (रा. कात्रज, पुणे) या दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही वर्षांपूर्वी फिर्यादी नागनाथ यांची किशोर चव्हाण याच्याशी भारती विद्यापीठात ओळख झाली होती. त्यानंतर त्या ओळखीचे मैत्रीमध्ये रूपांतर झाले. 

एप्रिल २०१५ मध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आणि क्लार्क या पदाची भरती निघाली आहे. जर कोणी डी.एड.ची पदविका प्राप्त केलेले मुले असल्यास सांगा, त्यांच्या नोकरीचे काम करतो, असे किशोरने फिर्यादीस सांगितले. फिर्यादीने त्यांचा भाऊ गोरखनाथ क्षीरसागर, पुतणी  पूजा यशवंत हे दोघे डी. एड. शिक्षण झालेले होते. त्यांना नोकरी लावण्याचे नागनाथ यांनी किशोरला सांगितले.

टप्प्याटप्प्यात दिली होती रक्कम- फिर्यादी नागनाथ यांनी भाऊ आणि पुतणीचे प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे पाच लाख रुपये हे आरोपीस चेक आणि आरटीजीएसद्वारे त्याच्या बँक  खात्यावर भरले. सूरज धोत्रे, सत्तू भोसले या दोघांनी प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे पाच लाख आरोपीच्या बँक खात्यावर जमा केले. अनिता चव्हाण यांनी दीड लाख रुपये आरोपी किशोरला रोख स्वरुपात दिले. तर ३५ हजार रुपये हे अर्चना चव्हाण हिच्या बँक खात्यावर जमा केले. आरोपीने फिर्यादीस नोकरीचे काम होत नाही, पुणे येथील प्लॉट विकून पैसे परत देतो, असे सांगितले. मात्र पैसे परत न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी