Children's Day Special; सातवीची वैष्णवी घंटे करते सलग दोन तास स्केटिंग

By appasaheb.patil | Published: November 14, 2019 02:39 PM2019-11-14T14:39:54+5:302019-11-14T14:44:14+5:30

बालदिन विशेष... प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत वैष्णवी ठरली विक्रमादित्य

Fourth Vaishnavite does skating for two hours in a row | Children's Day Special; सातवीची वैष्णवी घंटे करते सलग दोन तास स्केटिंग

Children's Day Special; सातवीची वैष्णवी घंटे करते सलग दोन तास स्केटिंग

Next
ठळक मुद्देबाळे येथील आकाश नगरात राहणारी वैष्णवी विनायक घंटे ही बाळे येथील जय मल्हार प्राथमिक शाळेची विद्यार्थिनीउस्मानाबाद-सोलापूर हे ७३ किलोमीटर अंतरही तिने सहजपणे पार केलेवैष्णवी घंटे ही अतिशय हुशार, चाणाक्ष मुलगी आहे़ सतत काहीतरी नवं करण्याचं तिच्या मनात असतं... 

सुजल पाटील

सोलापूर : वैष्णवी एक वर्षाची असताना वडिलांनी जग सोडले़़़़ते देवाघरी गेल्यानंतर घरावर सर्वात मोठा दु:खाचा डोंगर कोसळला़़़घरकाम करीत कसेबसे आईने घराला सावरले़़़अशातच हिम्मत न हरता आईने वैष्णवीला वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीच्या वर्गात शाळेत घातले़़़वैष्णवीनेही मोठ्या धैर्याने एकही दिवस शाळा न चुकविता नियमित शाळेत जात काहीतरी नवं करून दाखविण्याची जिद्द मनात ठेवत अवघ्या तेराव्या वर्षी सलग दोन तास स्केटिंग करण्याचा विक्रम वैष्णवीने केला़ मुलीने केलेला हा विक्रम पाहून आईचे डोळेही पाणावले़़़अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विक्रमादित्य ठरणाºया वैष्णवीच्या यशाबाबत बालदिनाचे औचित्य साधत ‘लोकमत’ ने घेतलेला हा छोटासा आढावा.

बाळे येथील आकाश नगरात राहणारी वैष्णवी विनायक घंटे ही बाळे येथील जय मल्हार प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी. वैष्णवी एक वर्षाची असतानाच वडील विनायक घंटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर संपूर्ण घंटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, नातेवाईकांमधील काहींनी वैष्णवीच्या कुटुंबीयांवर पडलेल्या दु:खाच्या डोंगरातून सावरण्यासाठी मदत केली.

कसेबसे वैष्णवीच्या आईने घरकाम करीत घराला सावरण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली़ आपली आई आपल्यासाठी एवढं कष्ट घेतेय हे पाहून मुलांनीही शिक्षणात चांगलाच रस घेत, जिल्हाधिकारी, डॉक्टर, शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं़ त्या पद्धतीने अभ्यास करण्यास सुरुवातही केली़ पहिली ते चौथीपर्यंत वैष्णवीने वर्गात टॉपच राहण्याचा प्रयत्न केला़ यासाठी तिला शाळेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर ढेपे, मुख्याध्यापक अमोल ढेपे, वर्गशिक्षिका सुषमा नागटिळक, काका दीपक घंटे, आई मुकरंद (माया), आजी भागीरथी, भाऊ आनंद यांनी मोलाची मदत करीत सतत नवं काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया हा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस एक तास स्केटिंग करून पूर्ण केला़ या रेकॉर्डसाठी राज्यातील ६ हजार मुलांनी सहभाग नोंदविला होता़ त्यात सोलापुरातील १२० स्केटर्स होते़ यात सर्व मुला-मुलींनी हातात तिरंगा झेंडा घेऊन सलग दोन तास स्केटिंग केले़ 

उस्मानाबाद-सोलापूर हे ७३ किलोमीटर अंतरही तिने सहजपणे पार केले
एवढेच नव्हे तर उस्मानाबाद ते सोलापूर हे ७३ किलोमीटरचे अंतर वैष्णवी हिने स्केटिंग करीत पार केले़ या दोन्ही विक्रमादित्य वैष्णवी हिचे सर्वस्तरातून कौतुक झाले़ यावरुन तिची जिद्द, चिकाटी अन् धडपड दिसून येते. भविष्यात मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे तिने अभिमानाने सांगते. 

वैष्णवी घंटे ही अतिशय हुशार, चाणाक्ष मुलगी आहे़ सतत काहीतरी नवं करण्याचं तिच्या मनात असतं... शाळेत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमात ती हिरिरीने सहभाग नोंदविते़ तिने आजपर्यंत विविध पारितोषिके मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे़ शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा ती खूप आदर करते़ याशिवाय शाळेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर ढेपे यांचाही वैष्णवीच्या यशात मोलाचा वाटा आहे़
- अमोल ढेपे,
मुख्याध्यापक, 
जय मल्हार प्राथमिक शाळा, बाळे

Web Title: Fourth Vaishnavite does skating for two hours in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.