सोलापूर विद्यापीठात चौथा नामविस्तार दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 4, 2023 14:12 IST2023-03-04T14:11:39+5:302023-03-04T14:12:54+5:30

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे

Fourth Name Expansion Day in Solapur University on Monday | सोलापूर विद्यापीठात चौथा नामविस्तार दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर विद्यापीठात चौथा नामविस्तार दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा चौथा नामविस्तार दिनाचा सोहळा सोमवार, ६ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. कुलगुरू डॉ.  मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे उद्घाटन होईल. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कल्याणकारी नेतृत्व' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

Web Title: Fourth Name Expansion Day in Solapur University on Monday