शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

मोहोळजवळ अवैध वाळु वाहतुक करणाºया आठ वाहनांसह साडेचार ब्रास वाळू जप्त,  नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मोहोळ पोलीसांची कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:59 AM

तालुक्यातील सीना नदीवरील बोपले बंधाºयातून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून ८ वाहनांसह (किंमत ७४ लाख १८ हजार रुपयांची वाहने) साडेचार ब्रास वाळू ताब्यात घेऊन ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे बेकायदा वाळू उपसा व वाहतूक संदर्भात तक्रारी आल्या होत्यापोलीस नाईक राजेंद्र बाबर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोहोळ दि १३  : तालुक्यातील सीना नदीवरील बोपले बंधाºयातून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून ८ वाहनांसह (किंमत ७४ लाख १८ हजार रुपयांची वाहने) साडेचार ब्रास वाळू ताब्यात घेऊन ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे बेकायदा वाळू उपसा व वाहतूक संदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने विशेष पथकाने सीना नदीपात्रातील बोपले बंधारा येथे छापा मारला असता ८ वाहनांसह साडेचार ब्रास वाळू तसेच मिनाज दाऊद सय्यद (वय २४, रा. खिरनीमळा, ता. उस्मानाबाद), वसीम हुसेन शेख (वय २२ रा. फकीरानगर, उस्मानाबाद), शंकर मल्हारी गायकवाड (वय ३५, रा. माळुंब्रा ता. तुळजापूर), महेश नामदेव पाचपुंड (वय २२, रा. अनगर, ता. मोहोळ), आण्णा हरिदास थिटे (वय २४, रा. नालबंदवाडी), सुधीर अरुण काकडे (वय ३१), मंगेश बाळासाहेब थिटे (वय ३० दोघे रा. अनगर, ता. मोहोळ), विठ्ठल बाळू माने (वय २७, रा. गलंदवाडी, ता. मोहोळ), सुनील सत्यवान नागटिळक (वय ३२, रा. कुंभेज, ता. माढा) यांना  ताब्यात घेऊन व वाहनांचे मालक सचिन लोखंडे, तौसिफ हुसेन शेख (दोघे रा. उस्मानाबाद), नाना अमृतराव (रा. शुक्रवार पेठ, ता. तुळजापूर)  यांच्याकडून एकूण ७४,१७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, हवालदार मनोहर माने, श्रीकांत बुरजे, सोमनाथ बोराटे, अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, विष्णू बडे, सिद्धाराम स्वामी यांनी केली. या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र बाबर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड करीत आहेत.------------------------ पाच ब्रास वाळूसह डंपर जप्तअरबळीच्या भीमा नदीच्या पात्रातून अवैधपणे वाळू घेवून निघालेला पाच ब्रास वाळूसह डंपर कामती पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई ९ जानेवारी सकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. डंपर क्र. एम. एच. १३/ ए. एक्स २७७० हा मंगळवेढा-सोलापूर मार्गावरुन निघाला होता. मुन्ना उर्फ खानसाहेब गुडू उर्फ हुसेनी शेख (बरूर, ता. द. सोलापूर) फरार झाला होता. त्याला आज अटक करण्यात आली. फिर्याद पो.हे.कॉ. सुरेश मणुरे यांनी दिली असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.एस. गायकवाड हे करित आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस