कुर्डुवाडी गोळीबारातील चार आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:14 IST2020-07-11T11:14:09+5:302020-07-11T11:14:15+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Four accused in Kurduwadi shooting were arrested by Solapur Rural Police | कुर्डुवाडी गोळीबारातील चार आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

कुर्डुवाडी गोळीबारातील चार आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

कुर्डुवाडी : कुर्डुवाडी शहरातील नामांकित किराणा दुकानाचे व्यापारी प्रवीण ढवळसकर यांच्यावर दुकान लावून सायंकाळी सव्वा नऊच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना पैशासाठी अज्ञात दरोडेखोरांनी २३ जून मंगळवार रोजी कुबेर मंगल कार्यालयासमोर रहदारीच्या ठिकाणी गोळीबार करून हल्ला केला होता. त्यामुळे शहर व परिसर अक्षरशः हादरून गेला होता, तेव्हापासून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 


या घटनेला तीन आठवडे उलटत आल्यानंतर शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास सोलापूर येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्या प्रकरणातील संशयित आरोपींना कुर्डुवाडी बायपास रोडवर पिस्तुलसह अटक केली आहे.

दरम्यान, अटक आरोपींमध्ये  भैया लेंगरे ( वय-३३,रा कुर्डुवाडी ता. माढा), सुरज ज्योतिराम भोसले ( वय-३२,रा कुर्डु ता. माढा), गणेश गायकवाड( वय -३०, रा. कुर्डु ता. माढा) व गणेश कापरे ( वय - ३०, रा कुर्डु ता. माढा) यांचा समावेश आहे. ही कारवाई सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे.

Web Title: Four accused in Kurduwadi shooting were arrested by Solapur Rural Police