राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड यांचा अजितदादांना पाठिंबा
By राकेश कदम | Updated: July 10, 2023 13:53 IST2023-07-10T13:53:47+5:302023-07-10T13:53:58+5:30
महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण चार नगरसेवक निवडून आले होते.

राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव, नागेश गायकवाड यांचा अजितदादांना पाठिंबा
सोलापूर: महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण चार नगरसेवक निवडून आले होते. जाधव यांच्याकडे राष्ट्रवादीचे गटनेते पद होते. अजित पवार यांच्या बंडानतर सोलापूर शहरातून संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी अजितदादांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला होता. जाधव आणि गायकवाड यांनीही सोमवारी सकाळी अजितदादांची भेट घेतली. यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे उपस्थित होते.