काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल बीआरएस पक्षात सामील

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 27, 2023 18:21 IST2023-03-27T18:19:42+5:302023-03-27T18:21:15+5:30

पत्रकार परिषदेत दिली माहिती

Former Congress MP Dharmanna Sadul joins BRS party of KCR | काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल बीआरएस पक्षात सामील

काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल बीआरएस पक्षात सामील

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: काँग्रेस पक्षाकडून दोन वेळा खासदार राहिलेले धर्मण्णा सादूल हे तेलंगणाच्या बीआरएस पक्षात सामील होत असल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रापेक्षा तेलंगणात अधिक प्रगती साधली असून त्यांच्या कामातून प्रेरणा घेत मी बीआरएस पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात सोलापुरात के. चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी सोमवारी दिली.

सोमवारी दुपारी पत्रकार संघात सादूल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे गणेश पेनगोंडा, राष्ट्रवादीचे रघुनाथ कंदीकटला तसेच धवलायन फाउंडेशनचे विक्रम पिस्के आदी उपस्थित होते.

Web Title: Former Congress MP Dharmanna Sadul joins BRS party of KCR