सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

By Appasaheb.patil | Updated: January 17, 2023 12:59 IST2023-01-17T12:59:30+5:302023-01-17T12:59:40+5:30

किरण पवार हे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हा. चेअरमन होते.

Former Chairman of Solapur Municipal Corporation Standing Committee Kiran Pawar passed away | सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती किरण पवार यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास जुना पुना नाका, बाळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

दरम्यान, किरण पवार हे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हा. चेअरमन होते. शिवाय खो-खो संघटनेवरही त्यांनी विविध मोठी पदे भूषविली होती. किरण पवार यांनी सोलापुरातील क्रिकेट वाढीसाठी मोलाचे योगदान दिले होते. मागील काही दिवसांपासून लिव्हर, किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर उपचार सुरू असतानाच त्यांची मंगळवारी पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालावली.

जुने घर शिवाजी चौकातून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून  त्यांच्यावर पुना नाका, बाळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेट संघटनेचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बुर्स यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी, सदस्य व क्रिकेट, खो-खो  खेळाडू यांनी शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Former Chairman of Solapur Municipal Corporation Standing Committee Kiran Pawar passed away