पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 13:13 IST2019-09-03T13:11:39+5:302019-09-03T13:13:41+5:30
एका व्यक्तीला पोलीसांनी घेतले ताब्यात; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त
पंढरपूर : शहरात ऐन गौरी गणपती सणाच्या काळातच शहरातील एका व्यक्तीकडून एक रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.
या प्रकरणी येथील शिवराज ननवरे (वय २२) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे पोलिसांमोर आव्हान असतानाच एका व्यक्तीकडे गावठी रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत काडतूसे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी (ता. २) मध्यरात्री संत गजानन महाराज मठा जवळच्या वाहन पार्किंग आवारात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयांनी ही कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.