शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:53 IST

सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात एप्रिल महिन्यापासून आॅपरेशन बंद

ठळक मुद्देखासगी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला दहा हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतोराष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत केली जातेअनेक आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक याचा लाभ घेतात

सोलापूर : जिल्ह्यामधील सुमारे ५०० ज्येष्ठ नागरिक हे प्रकाशाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद असल्याने याचा परिणाम झाला आहे. मागील चार महिन्यांपासून अशीच परिस्थिती असून ज्येष्ठ नागरिक हे शस्त्रक्रिया कधी होईल, याची वाट पाहत आहेत.

सोलापुरातील सिव्हिल आणि मदर तेरेसा हॉस्पिटलसोबतच करमाळा, पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय तर माढा, सांगोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होते. जून महिन्यात सांगोला येथे शस्त्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून माढा व करमाळा येथे जुलै महिन्यात शस्त्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, अशा रुग्णांना तत्काळ रुग्णालयात बोलावण्यात येत आहे.

शस्त्रक्रिया होत असलेल्या सर्व रुग्णालयांना रुग्णांची यादी करण्यास सांगण्यात आले आहे. या यादीत किती जणांचा मोतीबिंदू पिकला आहे हे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारच्या रुग्णावर प्रथम शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. 

खासगी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला दहा हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. मात्र राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक याचा लाभ घेतात.

ओपीडीमध्ये सरासरी १० रुग्ण...जवळच्या एखाद्या गावात बाजार असल्यास डोळे तपासण्यासाठी आधी १५० लोक यायचे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज फक्त सरासरी १० रुग्ण येतात. यापैकी एक किंवा दोघांनाच शस्त्रक्रियेची गरज असते. बºयाच ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था नाही. तसेच लोकही कोरोना विषाणूला घाबरून तपासणीला येत नसल्याने ओपीडीमध्ये कमी संख्येने रुग्ण येत आहेत. वयाच्या ५० वर्षांपुढील व्यक्तीमध्ये मोतीबिंदू होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे रुग्णाला अंधुक दिसते. यावर वेळीच उपचार न केल्यास त्याचे रूपांतर हे काचबिंदूमध्ये होते.

एप्रिल महिन्यापासून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. सांगोल्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली असून, काही दिवसात माढा आणि करमाळा येथेही सुरू करणार आहोत. सिव्हिलमध्ये सध्या फक्त गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करत आहोत. पीपीई किट, मास्क आदी सर्व सुरक्षेची काळजी घेऊन शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.- डॉ. गणेश इंदूरकर, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलoperation all outऑपरेशन ऑल आऊटeye care tipsडोळ्यांची काळजी