शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

पंढरपूरला निघालेल्या टेम्पोचा अपघात; 5 वारकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 10:58 AM

पिकअपची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक 

सांगोला: भरधाव पिकअपची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. जखमीपैंकी चौघांवर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत तर दोघांना किरकोळ मार लागला आहे. हा भीषण अपघात आज शुक्रवार पहाटे 5 च्या सुमारास सांगोला - पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ शब्बीर मुलाणी यांच्या वस्ती समोर घडला. चालक यल्लाप्पा देवाप्पा पाटील (वय 37 रा.हंगरगा ता.जि.बेळगावी), कृष्णा वामन कणबरकर (वय 42), महादेव मल्लाप्पा कणबरकर (वय 45), लक्ष्मण परशुराम आंबेवडीकर (वय 45), अरुण दत्तात्रेय मूतभेकर (वय 37) सर्वजण रा. मंडोळी ता. जि. बेळगावी असे ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत. तर परशुराम गणपत दळवी वय 32 रा. मंडोळी, गणपत यल्लाप्पा दळवी वय 70, तमान्ना नारायण साळवी वय 50 , वैजिनाथ मारुती कनबरकर वय 45 सर्वजण रा.मंडोळी , गुंडू विठ्ठल तरळे वय 70 रा.मन्नूर, दिलीप मारूती शेरेकर वय 25 रा.बसीरकट्टी ता.जि.बेळगावी अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.बेळगावीमधील वारकरी पिकअपमधून गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठलच्या देवदर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान चालक यल्लापा पाटील वगळता सर्वजण पिकअपच्या पाठीमागे हौद्यात बसले होते. वाटेत चालकासह सर्वानी मिळून मिरजच्या बाहेर चहा घेतला आणि पुढील प्रवासासाठी निघाले. त्यांची पिकअप सांगोला मार्गे पेढरपूरकडे जात होती. तर पंढरपूरकडून एम.एच.13 ए.एस.0992 हा ट्रॅक्टर दोन ट्रॉलीमध्ये विटा भरून सांगोल्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी दोन्ही वाहने मांजरी गावाजवळ शब्बीर मुलाणी यांच्या वस्तीसमोर आली असता भरधाव पिकअपने ट्रॅक्टर ट्रॉलीला समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. 

टॅग्स :Pandharpurपंढरपूर