In the fishing crisis; Man-made pollution ride to the right backwater | मासेमारी संकटात; उजनी बॅकवॉटरला मानवनिर्मित प्रदूषणाचा फेरा
मासेमारी संकटात; उजनी बॅकवॉटरला मानवनिर्मित प्रदूषणाचा फेरा

ठळक मुद्देउजनी धरण बॅकवॉटरवर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग हिरवट तवंग आल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक बनलेउजनी धरणमधील पाण्याला मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्याने गटारगंगेचे स्वरूप

कोर्टी: सोलापूर- पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाºया भीमा नदीवरील आणि उजनी धरण बॅकवॉटरवर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग आल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक बनले आहे. एकेकाळी स्वच्छ, निर्मळ असलेल्या भीमा नदीचे सौंदर्य प्रदूषणाच्या फेºयात अडकले आहे. उजनी धरणमधील पाण्याला मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्याने गटारगंगेचे स्वरूप आले आहे, हे धोकादायक असल्याचा सूर पर्यावरण तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.

उजनी जलाशयात पुणे जिल्हा व परिसरातील वापरलेले, सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतीमधील खराब केमिकलयुक्त पाणी, कोणतीही प्रक्रिया न करता थेट येत असल्याने दूषित झालेले पाणी जलाशयामधून बहुतांश गावांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत पिण्यासाठी उचलले जाते. यामुळे या पाण्यात असणाºया  विविध जलचरांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात नसल्याची खंत निसर्गप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. भीमा नदीच्या सौंदर्यावर प्रदूषणाचा घाला घालणाºया अवैध व्यवसायांवर वेळीच निर्बंध घालावे, अशी मते व्यक्त होऊ लागली आहेत. 

नदीवरील मासेमारी संकटात
सबंध भीमा नदी पात्रात मासेमारी हा मोठा व्यवसाय चालतो. मासेमारीचा व्यवसाय करणाºयांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरले असता या विषारी पाण्यामुळे अक्षरश: मानवी शरीराला खाज येत आहे. असे असताना उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांना आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करावी लागते, अशी व्यथाही मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली. 

पक्ष्यांच्या प्रजातींवर परिणाम

  • - भीमा नदीच्या अथांग पात्रात विविध जातींच्या पक्ष्यांची कायम रेलचेल असते. विशेषत: हिवाळ्याच्या सुरुवातीला विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. त्याचबरोबर अनेक स्थानिक पक्षीही नदीकाठावर आपली उपजीविका करतात.  मात्र दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे विविध जातीच्या पक्ष्यांचा वावर कमी झाला आहे. विदेशी पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे पर्यावण अभ्यासक  डॉ़ अरविंद कुंभार यांनी सांगितले.
  • जलीय परिसंस्था धोक्यात
  • - जमिनीप्रमाणे पाण्यातही अनेक परिसंस्था असतात. पाण्यात जीवन जगणाºया अनेक वनस्पती, पाण्याच्या तळाशी  राहणारे अनेक जलचर प्राणी, विविध जातींचे मासे , खेकडे, झिंगे , कासव असे अनेक जीव जलीय परिसंस्था अंतर्गत येतात. दुर्गंधीयुक्त हिरवट पाण्यामुळे जलीय परिसंस्था धोक्यात आलेल्या आहेत.
Web Title: In the fishing crisis; Man-made pollution ride to the right backwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.