पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:56 IST2023-06-24T20:55:30+5:302023-06-24T20:56:39+5:30
सोलापूर शहर व जिल्ह्यात सायंकाळपर्यंत तीन इंचाच्यावर पावसाची नोंद झाली आहे. आजचा पाऊस सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा चा काही भाग येथे झाला आहे.

पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शनिवारी सायंकाळी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसानं शहरातील अनेक दुकानात व घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
सोलापूर शहर व जिल्ह्यात सायंकाळपर्यंत तीन इंचाच्यावर पावसाची नोंद झाली आहे. आजचा पाऊस सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा चा काही भाग येथे झाला आहे.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर म्हणजे सोलापुरात तब्बल ४५ दिवसांनी पाऊस झाला आहे. मॉन्सूनला शहरात दमदार सुरुवात झाल्याने सोशल मीडियावर आनंद व्यक्त होत आहे.
पहिल्याच पावसानं मात्र शहरातील काही सखल भागामध्ये पाणी साठलं होतं. गणेश पेठ शॉपिंग सेंटर जवळ नाल्यात पाणी वाढल्याने आजूबाजूच्या दुकानांमध्ये ते शिरलं. याशिवाय रामलाल चौकातील अनेक घरात पाणी शिरले आहे.