शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

आधी पंढरपूर-आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आळंदी वारीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:47 IST

पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रथम पंढरपूर व आळंदी देवस्थानांची पाहणी करणार आहे. तेथील स्थिती पाहून व प्रमुख महाराज मंडळींशी ...

पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रथम पंढरपूर व आळंदी देवस्थानांची पाहणी करणार आहे. तेथील स्थिती पाहून व प्रमुख महाराज मंडळींशी चर्चा करून आळंदी येथील यात्रेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकारांना दिली.

विधानसभाध्यक्ष पटोले शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे व संत चोखामेळा महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पंढरपूर हे राज्याचे गौरवस्थान आहे. वारकरी ही संस्कृती आहे. पंढरपूर देवस्थान, विकास व व्यवस्थेचे भविष्यात काही नुकसान होणार नाही. त्यासंदर्भात विधानभवनात बैठक होईल. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी, वारकरी व अन्य मंडळी उपस्थित राहतील.

अधिवेशनासाठी नवीन नियमावली

सध्या कोरोनाचे संकट संपले नाही. अधिवेशनासाठी जादा लोक येतील. अनेक प्रश्नांवर लोक एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. परंतु दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसे चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल, यावर चर्चा सुरू आहे.

----

केंद्र सरकारने तोडगा काढावा

केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतमजुरांच्या विरोधात कृषीविषयक विधेयक पास केले आहे. मजूर व इतर शेतीसंबंधित कामगार यांच्याविरोधात विधेयक पास केल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे. त्या अनुषंगाने दिल्लीमध्ये सर्व राज्यांतून जो शेतकरी वर्ग जमा झाला आहे, यावर केंद्र सरकार तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.