'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:33 IST2025-07-01T10:31:09+5:302025-07-01T10:33:22+5:30

सोलापूर जिल्ह्यात नीरा नदीत पादुका स्नान होण्यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका वारकरी तरुण बुडाला. त्याचा शोध घेण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

Find the child's body, otherwise we will also jump into the Nira river Warkars warn the administration | 'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर नीरा स्नान पार पडते. याच नीरा स्नानापूर्वी एक तरुण नीरा नदीत बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. त्याचा मृतदेह शोधण्यात यावा, या मागणीसाठी वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. 

पुणे जिल्ह्यातील सराटी येथून सोलापूर जिल्ह्यात  संत तुकाराम महाराज पालखी प्रवेश करताना नीरा  नदीत पादुका स्नान  करण्यआधी दुर्घटना झाली.

जालना येथील युवक गोविंद नामदेव फोके हा नीरा नदीच्या पाण्यात बुडून मरण पावला आहे. ही घटना पहाटे सहा वाजता घडली. हा युवक रथामागील दिंडी क्रमांक बारामध्ये सामील होता.

देवराव बुवा हातगावकर असे दिंडीचे नाव असून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या झिरपी गावचे हे ग्रामस्थ आहेत. प्रयागबाई  प्रभाकर खराबे हे या  आजीसोबत गोविंद युवक वारीला आला होता. तो बारावीमध्ये शिकत होता. 

तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आंदोलन

नदीत बुडालेल्या गोंविदचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. वारकऱ्यांनी सराटीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू, असा पवित्रा घेत वारकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला.

Web Title: Find the child's body, otherwise we will also jump into the Nira river Warkars warn the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.